मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारतीय स्वातंत्र्य दिनाचा सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. याप्रसंगी शाळेचे माजी विद्यार्थी आणि सध्या मंत्रालयात कक्ष अधिकारी म्हणून महसूल व वनविभागात सेवेत असलेले श्री. शरद बाळासाहेब दराडेसाहेब यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले.यावेळी शाळेचे माननीय मुख्याध्यापक फादर माल्कम नातो,शाळेचे माननीय पर्यवेक्षक श्री.अनिल निकाळे सर प्राथमिक शाळेच्या माननीय मुख्याध्यापिका सौ. अर्चना निकाळे, मनमाड धर्म ग्रामाचे प्रमुख धर्मगुरु फादर सहाय्यराज शिक्षक पालक संघाचे उपाध्यक्ष श्री मुकुंद झाल्टे , माजी शिक्षक श्री दिलीप देवरे सर आदी मान्यवर उपस्थित होते. श्री. सुधाकर कातकडे, श्री. परविदर सिंग रिसम,श्री. दत्तू जाधवसर, श्री. स्वप्निल बाकळे सर यांच्या मार्गदर्शनाखाली शालेय गटातील विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट संचलन करून प्रमुख पाहुण्यांना मानवंदना दिली. प्रमुख पाहुण्यांची ओळख श्री. वसंत करवट सरांनी करून दिली. मान्यवरांचा सत्कार शाळेचे माननीय मुख्याध्यापक फादर माल्कम यांनी केला.क कुमारी वैष्णवी देवकर हिने स्वातंत्र्य दिनाचे महत्त्व आपल्या भाषणातून सांगितले.शालेय गायक वृंदाने सौ. अंजलीना झेवियर व श्री. अशोक गायकवाड सर यांच्या मार्गदर्शनाखाली देशभक्तीपर गीत सादर करून वातावरण भारावून टाकले. याप्रसंगी सौ. सविता करबट, कुमारी संपदा भोसले, श्रीमती सरिता देवरे, सिस्टर ज्योती, सौ मनिषा पानपाटील यांच्या मार्गदर्शनाखाली, प्राथमिक शाळेच्या बालकलाकारांनी तसेच माध्यमिक शाळेच्या विद्यार्थी कलाकारांनी देशभक्तीपर गीतावर उत्कृष्ट असे नृत्य सादर करून उपस्थितांचे लक्ष वेधले. इयत्ता दहावीतील गुणवंत विद्यार्थ्यांना व्यासपीठावरील उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके देऊन सन्मानित करण्यात आले. प्रमुख पाहुणे माननीय दराडे साहेबांनी आपल्या भाषणातून स्वातंत्र्य दिनाचे महत्त्व अधोरेखित करून आपल्या शालेय आठवणी याप्रसंगी जागा केल्यात. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लीना दत्तू जाधव तर आभार प्रदर्शन सौ मनीषा पान पाटील यांनी केले. गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्काराच्या कार्यक्रमाचे निवेदन श्री. सुनील कुमार कटारे सरांनी केले. आपल्या दमदार आवाजात श्री. दत्तू जाधव सर यांनी शेवटी घोषणा देऊन कार्यक्रमाचा समारोप केला. याप्रसंगी मनमाड पोलीस स्टेशनचे ए.पी.आय. हेमंत भंगाळे साहेबांनी उपस्थित विद्यार्थ्यांना व्यसनमुक्तीची शपथ दिली. प्रतिज्ञेचे वाचन कु.समृद्धी नाईकवाडे या विद्यार्थिनींनी केले. हा सोहळा पाहण्यासाठी विद्यार्थी शिक्षक यांच्याबरोबरच पालक तसेच माजी विद्यार्थ्यांनी देखील मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.