मनमाड शहरातील सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक क्षेत्रात कार्यरत असलेले नंदू किसन बेदाडे यांची नुकतीच F.C.I. गहू कामगार सहकारी पतसंस्था मर्या. मनमाड च्या चेअरमन पदी निवड करण्यात आली आहे.
ही निवड अत्यंत एकमुखाने व उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. बेदाडे यांच्या कामाची दखल घेत संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी व सभासदांनी त्यांच्यावर विश्वास टाकून जबाबदारी सोपविली आहे.
बेदाडे यांनी यापूर्वीही विविध सामाजिक कार्यात अग्रेसर राहून गोर-गरिबांना मदत केली आहे. कामगार वर्गाच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडविण्यासाठी त्यांनी कायम पुढाकार घेतला आहे. त्यांच्या निवडीमुळे संस्थेच्या कार्याला नवी दिशा मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.
त्यांच्या निवडीबद्दल संस्थेचे पदाधिकारी, सभासद तसेच नागरिकांमध्ये आनंद व्यक्त होत असून, पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या जात आहेत.