Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

मनमाड महाविद्यालयात ‘आविष्कार’ स्पर्धा संपन्न

Sep 12, 2025

 

मनमाड : महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला, विज्ञान व वाणिज्य स्वायत्त महाविद्यालयात दिनांक १० सप्टेंबर २०२५ रोजी रोजी विद्यार्थ्यांच्या नाविन्यपूर्ण कल्पना, संशोधन वृत्ती आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाला चालना मिळावी या उद्देशाने ‘आविष्कार’ संशोधन स्पर्धेचे आयोजन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अरुण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. या स्पर्धेसाठी मालेगाव येथील मसगा महाविद्यालयातील भौतिकशास्त्र विभागाचे विभाग प्रमुख डॉ. के एस ठाकरे व शैक्षणिक पर्यवेक्षक डॉ. एम बी सोनवणे हे परीक्षक म्हणून लाभले. या स्पर्धेसाठी ५० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांनी विविध विषयांवर आधारित नाविन्यपूर्ण असे पोस्टर प्रेसेंटेशन प्रस्तुतीकरण केले. विद्यार्थ्यांनी समाजोपयोगी संशोधन प्रकल्प, प्रात्यक्षिके व सादरीकरणे सादर करून आपली कल्पकता व संशोधनाची दृष्टी व्यक्त केली. परीक्षकांनी विद्यार्थ्यांच्या सादरीकरणांचे बारकाईने परीक्षण करून उत्तम कल्पना व प्रकल्पांना पारितोषिके जाहीर केली.कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान प्राचार्य डॉ. अरुण पाटील यांनी भूषविले. परीक्षकांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, विद्यार्थ्यांनी संशोधन क्षेत्रात पुढाकार घ्यावा व समाजहितासाठी उपयुक्त शोध लावावेत असे आवाहन केले. कार्यक्रमास कुलसचिव समाधान केदारे, शैक्षणिक पर्यवेक्षक प्रा डी व्ही सोनवणे, डॉ संजय चिंचोले, प्रा समाधान सुखदेवे, विभाग प्रमुख, प्राध्यापक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी शैक्षणिक संशोधन समन्वयक डॉ.राहुल काळे, डॉ. पवन सिंग परदेशी यांनी परिश्रम घेतले.

अजून बातम्या वाचा..

एच.ए.के.हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज,मनमाड मध्ये स्वातंत्र्य दिन मोठया उत्साहात साजरा

एच.ए.के.हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज,मनमाड मध्ये स्वातंत्र्य दिन मोठया उत्साहात साजरा

मनमाड : एच.ए.के.हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज मध्ये संस्थेच्या सदस्य आयशा सलीम गाजीयानी यांच्या...

read more
अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल्सची स्वातंत्र्यदिना निमित्त नागरिकांसाठी विशेष आरोग्य पॅकेज

अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल्सची स्वातंत्र्यदिना निमित्त नागरिकांसाठी विशेष आरोग्य पॅकेज

अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल्सची स्वातंत्र्यदिना निमित्त नागरिकांसाठी विशेष आरोग्य पॅकेज नाशिक, १५...

read more
मनमाड शहर भाजपा चे रक्तदान क्षेत्रातील दोन दशकांचे अखंडित सेवा कार्य गौरवास्पद :शंकरराव वाघ

मनमाड शहर भाजपा चे रक्तदान क्षेत्रातील दोन दशकांचे अखंडित सेवा कार्य गौरवास्पद :शंकरराव वाघ

मनमाड - शहर भाजप मंडलाच्या वतीने सलग 20 व्या वर्षी अखंड भारत दिनी निमित्त आयोजित रक्तदान शिबीरात...

read more
फरहानदादा खान यांच्या वाढदिवसानिमित्ताने एच.ए. के. हायस्कूल &ज्यु. कॉलेज मधिल विदयार्थ्यांना राष्ट्रीय ध्वज वाटप.

फरहानदादा खान यांच्या वाढदिवसानिमित्ताने एच.ए. के. हायस्कूल &ज्यु. कॉलेज मधिल विदयार्थ्यांना राष्ट्रीय ध्वज वाटप.

  मनमाड:- आमदार मा.सुहास (आण्णा) कांदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना युवासेना...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]