Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

राष्ट्रीय सेवा योजनेतून त्याग वृत्ती निर्माण होते – डॉ. सी.जी.दिघावकर

Jan 7, 2026

“शाश्वत विकासासाठी युवक पाणलोट आणि पडीत जमीन व्यवस्थापन,” या थीम अंतर्गत हे शिबीर होत आहे.तरुणांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून निमोण येथील सात दिवसीय विशेष श्रमसंस्कार शिबिरातून मिळणार आहे. महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ,राष्ट्रीय सेवा योजनेचे विशेष श्रमसंस्कार शिबिर निमोण येते संपन्न होत आहे.

शिबिराचे उदघाटन मनमाड महाविद्यालयीन विकास समितीचे अध्यक्ष प्राचार्य डॉ.सी.जी.दिघावकर, प्रमुख पाहुणे नाशिक रासयो जिल्हा समन्वयक डॉ.डी.के.आहेर, निमोण गावच्या सरपंच डॉ.स्वाती देवरे, महाविद्यालय विकास समितीच्या सदस्या श्रीमती अलका शिंदे, प्राचार्य डॉ.अरुण पाटील, ग्रामपंचायत सदस्य प्रवीण बोडके, गणेश दखणे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले.

या शिबिराच्या माध्यमातून स्वयंसेविकांमध्ये त्याग वृत्ती निर्माण होते, विद्यार्थ्यांमधील सर्वांगीण गुणांचा विकास होऊन, समाजाबद्दलचे आपले देणे याची जाणीव निर्माण होते श्रमसंस्कार शिबिरातून अनेक विषय हाताळले जातात ज्यातून विद्यार्थ्यांचे बौद्धिक क्षमता वृद्धिंगत होते व तसेच श्रम संस्कारांमधून विद्यार्थ्यांची शारीरिक क्षमताही विकसित होते हेच या शिबिराचे खरंतर गोतक आहे. असे प्रतिपादन या शिबिराचे उद्घाटक डॉ.सी.जी दिघावकर सर यांनी केले.

शिबिरातून जैवविविधता, जलसंवर्धन, विविध सर्वे, वृक्षा रोपण अशा उपक्रमातून गावाचा शाश्वत विकास होऊ शकतो व शिबिरातुन तरुणांची वैचारिक बौद्धिक क्षमतेची जडणघडण होते याची माहिती रा.से. यो. चे जिल्हा समन्वयक डॉ. डि.के आहेर यांनी दिली. महिला सबलीकरण व सक्षमीकरण, विधवा महिलांना समाजात दिली जाणारी वागणूक, या विषयी मार्गदर्शन सरपंच डॉ. स्वाती देवरे, श्रीमती अलकाताई शिंदे यांनी केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अरुण पाटील, यांनी स्वयंसेवकांना संबोधताना विद्यार्थ्यांनी आपला कलागुणांबरोबर गावातील नागरिकांना शासनाच्या अनेक उपक्रमांची माहिती देऊन त्यांना त्या योजनेसाठी प्रेरित करावे, असे प्रतिपादन केले.

उपप्राचार्य प्रा. डॉ.बी. एस. देसले, कुलसचिव श्री समाधान केदारे यांचे सहकार्य लाभले. सूत्रसंचालन कु. ऋतुजा जाधव, कु. वैष्णवी कोळपे, कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यक्रमाधिकारी डॉ पवनसिंग परदेशी, पाहुण्यांचा परिचय डॉ. आरती छाजेड तर आभार प्रा. सोमनाथ पावडे, यांनी मानले. महाविद्यालयाचे पर्यवेक्षक प्रा. डी व्ही सोनवणे, डॉ. संजय चिंचोले, प्रा.समाधान सुखदेव, प्रा राजेंद्र बागुल, प्रा. अनिल शिरसाट, सविता पवार, डॉ रोहित शिंदे, प्रा संदीप वाघ, सुहास वराडे, प्रा. निलेश चौधरी सह गावातील सन्माननीय ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ, कर्मचारी, प्राध्यापक वृंद, प्रशासकीय कर्मचारी यांनी या शिबिरासाठी शुभेच्छा दिल्या.

अजून बातम्या वाचा..

मनमाड शहराचे आराध्य दैवत व नवसाला पावणाऱ्या वेशीतील श्री निलमणी गणेश मंदीरात 1997 पासून सलग 29 व्या वर्षी यंदा 11 दिवस भाद्रपद महागणेशोत्सव

मनमाड शहराचे आराध्य दैवत व नवसाला पावणाऱ्या वेशीतील श्री निलमणी गणेश मंदीरात 1997 पासून सलग 29 व्या वर्षी यंदा 11 दिवस भाद्रपद महागणेशोत्सव

मनमाड - बुधवार दिनांक 27 /08/2025 रोजी भाद्रपद शुध्द श्री गणेश चतुर्थी निमित्त सकाळी ठीक 09-30...

read more
मनमाड शहर भाजपा मंडल तर्फे 79 व्या स्वातंत्र्य दिना निमित्ताने ध्वजारोहण कार्यक्रम व भव्य तिरंगा रॅली चेआयोजन युवकांचा उस्फुर्त प्रतिसाद

मनमाड शहर भाजपा मंडल तर्फे 79 व्या स्वातंत्र्य दिना निमित्ताने ध्वजारोहण कार्यक्रम व भव्य तिरंगा रॅली चेआयोजन युवकांचा उस्फुर्त प्रतिसाद

भारतीय जनता पार्टी मनमाड शहर मंडलाच्या वतीने स्वतंत्र हिंदुस्थान च्या 79 व्या स्वातंत्र्य दिना...

read more
मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारतीय स्वातंत्र्य दिनाचा सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न

मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारतीय स्वातंत्र्य दिनाचा सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न

मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारतीय स्वातंत्र्य दिनाचा सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला....

read more
नांदगाव-मनमाड मराठी पत्रकार संघाच्या वतीने स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या शहर पातळीवरील शालेय देशभक्तीपर समूह गीत गायन स्पर्धेला भरघोस प्रतिसाद

नांदगाव-मनमाड मराठी पत्रकार संघाच्या वतीने स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या शहर पातळीवरील शालेय देशभक्तीपर समूह गीत गायन स्पर्धेला भरघोस प्रतिसाद

मनमाड -- नांदगाव-मनमाड मराठी पत्रकार संघाच्या वतीने स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]