loader image
[ays_poll id=7]

फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचार मंच व मुस्लिम लायब्ररी यांच्यातर्फे फातिमाबी शेख यांची जयंती साजरी

Jan 9, 2026


म.ज्योतिबा फुले व क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले यांच्या स्त्री शिक्षणाच्या कार्यात स्वतःला वाहून घेणाऱ्या पहिल्या मुस्लिम महिला शिक्षिका ज्ञानमाता फातिमामाई शेख यांची जयंती शिवसेनेचे शहर प्रमुख मयूर बोरसे यांच्या अध्यक्षते साजरी करण्यात आली. मनमाड नगरपालिकेच्या विद्यमान नगसेविका तसेच आदर्श शिक्षिका रुपाली पगारे व माजी नगरसेविका कॉम्रेड ऍड. साधना.गायकवाड यांच्या हस्ते क्रांतिकारी फातिमा बी यांची प्रतिमा पूजन करण्यात आले.प्रा.राजु लहिरे, साधना गायकवाड यांनी आपल्या मनोगतात कॉम्रेड माधवराव गायकवाड यांनी एकरा गर्ल्स हायस्कूल तसेच मुस्लिम लायब्ररी यांच्या माध्यमातून देण्यात आल्या ची आठवण करून दिली गान कोकिळा लताजी मंगेशकर यांचे पहिलीचे ऍडमिशन एडवोकेट साधनाताई गायकवाड यांच्या आई कॉम्रेड कुसुमताई गायकवाड यांनी केले होते. फातिमामाई शेख यांचे खडतर जीवनाला व त्यांच्या कार्याला उजाळा दिला.तसेच याप्रसंगी प्रा.राजु लहिरे यांना नुकताच पुणे येथे झालेल्या अंतरराष्ट्रीय फुले फेस्टिवलचे अध्यक्षस्थान भूषवून संविधानदूत पुरस्कार मिळाल्या बद्दल त्यांचा फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचार मंचच्या वतीने मयूर भाऊ बोरसे हाजी रफिक बाबूजी हाजी शफी मुसा. फिरोज शेख यांच्या हस्ते शाल व गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाचे प्रस्तविक मध्ये फिरोज शेख यांनी सध्याच्या युगात मराठी व उर्दू प्राथमिक शाळा बंद होत असल्याने चिंता व्यक्त केली प्रशासकीय अधिकारी व शिक्षक यांनी पालकांना घेऊन मराठी शाळा वाचविण्यासाठी नेहमी चर्चा सत्र घेण्यात यावे .त्यामुळे पालकांमध्ये जागृती निर्माण होऊन भविष्यात मराठी व उर्दू प्राथमिक शाळा वाचविण्याचे काम सोपे होईल तसेच सुज्ञ पालकांचे मराठी शाळेतील कल कमी होऊन इंग्रजी शाळेकडे जास्तीची फी इंग्रजी शाळेमध्ये ऍडमिशन घेत आहे. त्यामुळे मराठी शाळेंकडे पाठ दाखवून गोरगरीब वाड्या वस्ती वरचे विद्यार्थ्यांचे भविष्यात नुकसान होणार आहे. तसेच सर्व महापुरुषांचे विचार व संविधान या विषयावर नेहमी चर्चासत्रासारखे कार्यक्रम घेण्यात यावे असे देखील आव्हान करण्यात आले.

त्याकरिता शहरातील सुज्ञ नागरीक व पालकांनी जागृत होऊन मराठी शाळा वाचविण्यासाठी एक सुज्ञ पालकांची समिती बनविण्यात यावी असे आव्हान करून पहिली क्रांतिकारी फातिमा बी भारतीय शिक्षिका यांच्या खडतर जीवनाचा प्रसंग सांगितला. यावेळी कार्यक्रमास हाजी रफिक बाबूजी,हाजी शफी मुसा, एकरा गर्ल्स हायस्कूलचे संचालक एम.सलीम अहेमद,एकनाथ बोडखे,हाजी नजीर पठाण,ऍड.विजयकुमार आचालिया, एडवोकेट रिखब जैन, पानेवाडी चे व्यसनमुक्ती संघटनेचे समाजसेवक शिवाजी काळे. वंजारवाडीचे समाजसेवक नंदू आहिरे, जावीद शेख, शकूर शेख, रविराज अहिरे. सलमान आत्तार, सलीम शेख, जावीद पठाण, मतीन मन्सूरी.आदी मान्यवर उपस्थित होते. तसेच कार्यक्रमाचे आयोजन संयोजन जावेद शेख यांनी केले.


अजून बातम्या वाचा..

आयशा गाजियानी मॅडम यांना आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल एच.ए. के. हायस्कूल ज्यु.कॉलेज तर्फे सत्कार.

आयशा गाजियानी मॅडम यांना आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल एच.ए. के. हायस्कूल ज्यु.कॉलेज तर्फे सत्कार.

  मनमाड :- रोटरी क्लब ऑफ मनमाड तर्फे एच.ए. के. हायस्कूल अँड ज्यु. कॉलेज, मनमाड च्या...

read more
मनमाड शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी आश्रम वस्तीगृहास “प्रेरणाभूमी” म्हणून घोषित

मनमाड शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी आश्रम वस्तीगृहास “प्रेरणाभूमी” म्हणून घोषित

मनमाड, प्रतिनिधी, ता. २८ – मनमाड शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी आश्रम वस्तीगृहास...

read more
सातत्य पूर्ण रक्तदान शिबिराचे संयोजक म्हणून नितीन पांडे यांचा जनकल्याण रक्तकेंद्र नाशिक तर्फे सन्मान 

सातत्य पूर्ण रक्तदान शिबिराचे संयोजक म्हणून नितीन पांडे यांचा जनकल्याण रक्तकेंद्र नाशिक तर्फे सन्मान 

जनकल्याण रक्तकेंद्राच्या ३६ वा वर्धापन दिनानिमित्त शंकराचार्य संकुल गंगापूर रोड येथे शिबीर...

read more
के आर टी हायस्कूल मध्ये इयत्ता तिसरी ते चौथीच्या दोनशे विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन अतिशय सुंदर अशी श्री गणेशाची मानवी प्रतिमा साकारली

के आर टी हायस्कूल मध्ये इयत्ता तिसरी ते चौथीच्या दोनशे विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन अतिशय सुंदर अशी श्री गणेशाची मानवी प्रतिमा साकारली

दिनांक 26/8/2025 रोजी के आर टी हायस्कूल मध्ये इयत्ता तिसरी ते चौथीच्या दोनशे विद्यार्थ्यांनी एकत्र...

read more
भाटगाव विद्यालयातील अनोखा उपक्रम. पिंपळ पानावर श्रीगणेशाचे विविध रुपे चित्र रेखाटून विघ्नहर्त्याचे स्वागत…!

भाटगाव विद्यालयातील अनोखा उपक्रम. पिंपळ पानावर श्रीगणेशाचे विविध रुपे चित्र रेखाटून विघ्नहर्त्याचे स्वागत…!

आज दि.२६ ऑगस्ट २०२५ रोजी शिक्षण मंडळ भगूर संचालित नूतन माध्यमिक विद्यालय...

read more
.