loader image
[ays_poll id=7]

सोन्याप्रमाणे आता चांदीलाही हॉलमार्किंग?

Jan 11, 2026

चांदीच्या वाढत्या किमती आणि मागणीच्या पार्श्वभूमीवर सरकार एक महत्त्वपूर्ण बदल करण्याची तयारी करत आहे. केंद्र सरकार चांदीचे दागिने आणि वस्तूंसाठी हॉलमार्किंग अनिवार्य करण्याचा विचार करत जेणेकरून बाजारात शुद्धता, पारदर्शकता आणि ग्राहक संरक्षण मजबूत होऊ शकेल.

गेल्या काही दिवसांत चांदीच्या किमतींनी कहरच केला आहे. सराफा बाजाराप्रमाणे देश-विदेशातील फ्युचर्स मार्केटमध्येही चांदीचे दर गगनाला भिडले आहेत. चांदीच्या किमतीत सतत वाढ आणि गुंतवणूक व दागिन्यांच्या वाढत्या मागणीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार आता एक मोठं पाऊल उचलण्याची तयारी करत आहे. चांदीचे दागिने आणि कलाकृतींना सरकार अनिवार्य हॉलमार्किंग अंतर्गत आणण्याची शक्यता विचारात घेत आहे.

भारतीय मानक ब्युरो म्हणजे BIS चे महासंचालक संजय गर्ग म्हणाले की चांदीवर हॉलमार्क अनिवार्य करण्याची मागणी उद्योगाकडूनच येत आहे पण, लागू करण्यापूर्वी, BIS नियामक चौकट आणि आवश्यक पायाभूत सुविधांचे मूल्यांकन करत आहे. यामध्ये चाचणी क्षमता, परख मानके आणि प्रयोगशाळेच्या नेटवर्कची उपलब्धता यासारख्या बाबींचा समावेश आहे. ही प्रणाली लागू झाल्यानंतर ग्राहकांना आणि व्यापाऱ्यांना कोणत्याही अडचणी येऊ नयेत याची सरकार खात्री करू इच्छिते.

अजून बातम्या वाचा..

विद्यार्थ्यांनी सामाजीक मूल्ये जपावीत – डॉ श्री.संजय शांताराम सांगळे,सिद्धी क्लासेस गुणगौरव सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न

विद्यार्थ्यांनी सामाजीक मूल्ये जपावीत – डॉ श्री.संजय शांताराम सांगळे,सिद्धी क्लासेस गुणगौरव सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न

मनमाड - शंभर टक्के निकालाची परंपरा असलेला सिद्धी क्लासेस कॅम्पसचा गुणगौरव सोहळा 2024, 15 ऑगस्ट...

read more
अशोका मेडीकव्हर हॉस्पिटल्सचा आरोग्य व्यावसायिकांच्या समर्थनार्थ देशव्यापी आंदोलनात सहभाग

अशोका मेडीकव्हर हॉस्पिटल्सचा आरोग्य व्यावसायिकांच्या समर्थनार्थ देशव्यापी आंदोलनात सहभाग

नाशिक, १७ ऑगस्ट – अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल्सचा इंडियन मेडिकल असोसिएशन पुकारलेल्या देशव्यापी...

read more
कवी रबिंद्रनाथ टागोर हायस्कूल अँड ज्यु. काॅलेज, मनमाड येथे ७८ वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला

कवी रबिंद्रनाथ टागोर हायस्कूल अँड ज्यु. काॅलेज, मनमाड येथे ७८ वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला

बातमी : दिनांक: १५/०८/२०२४ . शाळेच्या परंपरेनुसार इयत्ता 10 वी मध्ये शाळेत प्रथम येणा-या...

read more
मनमाड – महामाया महिला मंडळाच्यावतीने बुधलवाडी येथील कपिल वस्तू बुद्ध विहारात भारतीय स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला

मनमाड – महामाया महिला मंडळाच्यावतीने बुधलवाडी येथील कपिल वस्तू बुद्ध विहारात भारतीय स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महामाया महिला मंडळाच्या अध्यक्षा अलकबाई केदारे होत्या. प्रारंभी...

read more
एच.ए.के.हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज,मनमाड मध्ये स्वातंत्र्य दिन मोठया उत्साहात साजरा

एच.ए.के.हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज,मनमाड मध्ये स्वातंत्र्य दिन मोठया उत्साहात साजरा

मनमाड : एच.ए.के.हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज मध्ये संस्थेच्या सदस्य आयशा सलीम गाजीयानी यांच्या...

read more
.