Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्त मनमाड महाविद्यालयात कीर्तन कार्यशाळा संपन्न

Jan 19, 2026

मनमाड येथील महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित, कला, विज्ञान व वाणिज्य (स्वायत्त) महाविद्यालयात मराठी विभाग व संशोधन केंद्रांतर्गत कीर्तन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.

महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभागातर्फे मराठी भाषा पंधरवडा १४ जानेवारी ते २८ जानेवारी या काळात साजरा केला जातो. मराठी भाषेचा प्रचार, प्रसार आणि संवर्धन करणे हा या मागील उद्देश आहे. या प्रसंगी महाराष्ट्रातील प्रसिद्ध कीर्तनकार ह.भ.प. राणी महाराज दौंड यांनी मार्गदर्शन केले. कार्यशाळेचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अरुण व्ही.पाटील यांनी या प्रसंगी मराठी भाषाचे जतन संवर्धन हे आपल्या महाराष्ट्रीयन संस्कृतीत रुजलेले आहे. महाराष्ट्रातील सण-उत्सव, परंपरा, जात्यावरील गीते, लोककथा, लोकगीते तसेच कीर्तन यातून मराठी भाषेचे जतन, संवर्धन व प्रसार मोठ्या प्रमाणत होऊ शकतो असे सांगितले. तसेच आपली भारतीय संस्कृती विश्वातील सर्व श्रेष्ठ संस्कृती आहे. भारतातील संत साहित्य, इतिहास, कुटुंब पद्धती हे विश्वाला मार्गदर्शक आहे असेही ते म्हणाले.

किर्तनकार ह.भ.प. राणी महाराज दौंड यांनी संत ज्ञानेश्वर, नामदेव, एकनाथ, तुकाराम महाराज यांच्या अभंगाचे निरुपण कसे करावे? याविषयी मार्गदर्शन केले. अभंगांचा अर्थ उलगडून सांगणे, त्यांचे स्पष्टीकरण देणे आणि त्यातील आध्यात्मिक, तात्त्विक व सामाजिक विचारांचे विश्लेषण कसे करावे? याविषयीही त्यांनी मार्गदर्शन केले. संतांचे विचार आजच्या युगात सुद्धा कसे लागू पडतात, हे उदाहरणासह मांडले. तसेच संतांच्या अभंगातून सानेगुरुजी यांनी केलेले वैचारिक प्रबोधनाचे दाखले दिले. अभंग, प्रबोधनपर गीते, गायन यांचा वापर कीर्तनात कसा करावा यावरही त्यांनी प्रकाश टाकला. तसेच कीर्तन करण्यासाठी अभ्यास आणि तयारी, विषय निवड, संत साहित्य, पुराणे, किंवा सामाजिक विषयांवर आधारित कीर्तन निवड, पूर्वरंगमध्ये देवाची स्तुती, अभंग, विषयाची प्रस्तावना असते. निवडलेल्या विषयाशी संबंधित कथा किंवा रूपकपर आख्यान, भारुड सादर करणे, अध्यात्मिक संदेश पाठांतर, अभंग आणि कथा पाठ करणे, सादरीकरण कौशल्य, प्रभावी वक्तृत्वासाठी आवश्यक सराव, ओघवती भाषा, स्पष्ट उच्चार आणि योग्य आवाजाचा वापर महत्त्वाचा असल्याचे त्यांनी सांगितले. टाळ, मृदुंग यांसारख्या वाद्यांसह गायनाचा सराव करणे, कीर्तनात रंजकता आणणे, भावनात्मकता, भगवंत भक्ती, धुंद होऊन सादरीकरण करणे कसे महत्वाचे असते याविषयी त्यांनी मार्गदर्शन केले. या कार्यशाळेचे प्रास्ताविक मराठी विभाग प्रमुख डॉ. धनराज धनगर यांनी केले तर सूत्रसंचालन व आभार प्रा. सोमनाथ पावडे यांनी केले. या कार्यशाळेला महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. बी. एस. देसले, कुलसचिव समाधान केदारे, शैक्षणिक पर्यवेक्षक डी.व्ही.सोनवणे, तसेच सर्व प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अजून बातम्या वाचा..

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग तिसरा टप्पा लोकार्पण सोहळा ना. दादा भुसे यांच्या हस्ते संपन्न

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग तिसरा टप्पा लोकार्पण सोहळा ना. दादा भुसे यांच्या हस्ते संपन्न

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग हा ७०१ किमी लांबीचा द्रुतगती महामार्ग आहे....

read more
राष्ट्रीय लोक अदालतमध्ये मृतकच्या परिवाराला मिळाली ४० लाखांची अपघात नुकसान भरपाई….

राष्ट्रीय लोक अदालतमध्ये मृतकच्या परिवाराला मिळाली ४० लाखांची अपघात नुकसान भरपाई….

मनमाड : नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयामध्ये आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय लोक अदालतमध्ये अनेक...

read more
केटचे राष्ट्रीय महासचिव प्रवीण खंडेलवाल यांना दिल्लीतुन उमेदवारीचे स्वागत – कल्पेश बेदमुथा सचिव,केट महाराष्ट्र

केटचे राष्ट्रीय महासचिव प्रवीण खंडेलवाल यांना दिल्लीतुन उमेदवारीचे स्वागत – कल्पेश बेदमुथा सचिव,केट महाराष्ट्र

संपूर्ण देशाच्या व्यापाऱ्यांची सर्वात मोठी संघटना असणारे अखिल भारतीय व्यापारी महासंघ यांचे...

read more
दुष्काळ सदृश मंडळाना मदती पासून ठेंगा –  महेंद्र बोरसे  तालुकाध्यक्ष राष्ट्रवादी शरद पवार गट

दुष्काळ सदृश मंडळाना मदती पासून ठेंगा –  महेंद्र बोरसे  तालुकाध्यक्ष राष्ट्रवादी शरद पवार गट

नांदगाव -(सोमनाथ घोंगाने) अंतरिम अर्थसंकल्पीय अधिवेशनात राज्य सरकारने  दुष्काळ सदृष्य मंडळांना...

read more
मनमाड सार्वजनिक वाचनालया चा शतकोत्तर वाटचाली निमित्त नाशिक ग्रंथोत्सव -2023 मध्ये शासना तर्फे सन्मान चिन्ह देऊन गौरव सत्कार

मनमाड सार्वजनिक वाचनालया चा शतकोत्तर वाटचाली निमित्त नाशिक ग्रंथोत्सव -2023 मध्ये शासना तर्फे सन्मान चिन्ह देऊन गौरव सत्कार

मनमाड - ग्रंथालय संचालनालय,महाराष्ट्र राज्य मुबंई,नाशिक जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, विभागीय...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]