loader image
[ays_poll id=7]

प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध – नागरिकांना हरकतीसाठी 30 सप्टेंबर पर्यंत मुदत

Sep 1, 2026

नाशिक : जिल्ह्यातील विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम (एसआयआर) अंतर्गत प्रारूप मतदारयादी सोमवारी (दि.३१) प्रसिद्ध झाली. या पुनरीक्षणामुळे जिल्ह्यातील एकूण मतदारसंख्या ५१ लाख ४ हजार ४५८ वरून ४० लाख ७६ हजार ६६६ इतकी झाली आहे. पुनरीक्षणादरम्यान तब्बल १० लाख २७ हजार ८९४ मतदारांची नावे वगळली आहेत. यात कायमस्वरूपी स्थलांतरित, मृत, दुबार नोंदणी तसेच शोध न लागलेल्या मतदारांचा प्रामुख्याने समावेश आहे, अशी माहिती उपजिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. मधुमती सरदेसाई यांनी दिली.

‘एसआयआर’ प्रक्रियेत नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक १ लाख ९३ हजार २३६, तर नाशिक पूर्वमध्ये १ लाख ६० हजार ५९० नावे वगळली आहेत. नाशिक मध्य मतदारसंघात १ लाख २० हजार ७९० नावे कमी झाली आहेत. मालेगाव बाह्य मतदारसंघातील मतदारसंख्या ३ लाख ८९ हजार ७८८ वरून ३ लाख २१ हजार ११२ झाली असून, ६८ हजार ६७६ नावे वगळली. मालेगाव मध्य मतदारसंघात ७४ हजार ६५१, तर नांदगाव मतदारसंघात ४४ हजार ७६० नावे वगळली आहेत.

अजून बातम्या वाचा..

नाशिक येथे होणाऱ्या शिवसेनेच्या निर्धार शिबिराच्या नियोजनासाठी गुरुवारी मनमाड येथे बैठक

नाशिक येथे होणाऱ्या शिवसेनेच्या निर्धार शिबिराच्या नियोजनासाठी गुरुवारी मनमाड येथे बैठक

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत संघटनात्मक बांधणीकरीता नाशिक...

read more
सरकारचा अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला.  जनसुरक्षा कायद्याविरोधात पत्रकार संघटनांची तीव्र निदर्शने

सरकारचा अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला. जनसुरक्षा कायद्याविरोधात पत्रकार संघटनांची तीव्र निदर्शने

  मुंबई,-- महाराष्ट्र सरकारच्या नव्याने आणलेल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्य कायद्याविरोधात...

read more
भुमी क्रिकेट अकॅडमीतील दक्ष पाटिल, हसन शेख, रुषी शर्मा, चिराग निफाडकर व रोहित पवार यांची नंदुरबार जिल्हा क्रिकेट आसोसिएशन अंडर 19 संघात निवड

भुमी क्रिकेट अकॅडमीतील दक्ष पाटिल, हसन शेख, रुषी शर्मा, चिराग निफाडकर व रोहित पवार यांची नंदुरबार जिल्हा क्रिकेट आसोसिएशन अंडर 19 संघात निवड

मनमाड - BCCI अंतर्गत असलेल्या महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन आयोजीत आमंत्रितांच्या स्पर्धेसाठी (...

read more
.