loader image
[ays_poll id=7]

दुष्काळाच्या या परिस्थितीत प्रशासनाने शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीर उभे राहावे – आ.कांदे

Sep 19, 2026

पावसाने पाठ फिरविल्यामुळे मतदार संघात दुष्काळ सदृश्य परिस्तिथी निर्माण झाली असून आज पाऊस जरी पडला तरी बळीराजाच्या तोंडचा घास हिरावला गेला आहे. या परिस्थितीवर उपाययोजना करण्या संदर्भात तालुक्याचे आमदार सुहास कांदे यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांसमवेत दुष्काळ आढावा बैठक घेतली.

बैठकीत जनावरांचा चाऱ्याचा तसेच पिण्याच्या पाण्यासाठी आवश्यक उपाययोजना करनेकामी प्रस्ताव शासनास सादर करणे, पीक पंचनामे, वाडेवस्त्यांवर पाणी टँकर व्यवस्था, पीक विमा भरपाई तसेच तालुक्यात दुष्काळ जाहीर होण्यासाठी आवश्यक पाठपुरावा करणेबाबत आमदारांनी सूचना केल्या. प्रशासकीय अधिकाऱ्यांनी परिस्थितीचे वास्तुनिष्ठ आणि सत्य अहवाल तयार करून आनेवारी 50% च्या आत दाखवावी, याबाबत निर्देश देखील दिले. वेळेप्रसंगी शेतात जाऊन शेतकऱ्यांना सहकार्य करण्याचे आवाहन आ.कांदे यांनी केले.

बैठकीला प्रांत अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी (BDO), तालुका कृषी अधिकारी, पशुसंवर्धन अधिकारी, मनमाड व नांदगाव नगरपरिषदेचे मुख्याधिकारी, मंडळ अधिकारी, विस्तार अधिकारी तसेच ग्रामसेवक तसेच युवासेना जिल्हाध्यक्ष फरहान खान, लोकनियुक्त नगराध्यक्ष सागर हिरे, विविध पदाधिकारी व कार्यकर्तेही उपस्थित होते.

अजून बातम्या वाचा..

नाशिक जिल्हा बँकेने ९ कर्जदारांना बजावल्या अंतीम जप्तीच्या नोटीसा; थकबाकीदारांमध्ये भीतीचे वातावरण ?

नाशिक जिल्हा बँकेने ९ कर्जदारांना बजावल्या अंतीम जप्तीच्या नोटीसा; थकबाकीदारांमध्ये भीतीचे वातावरण ?

नांदगाव : मारुती जगधने नांदगांव तालुक्यातील जिल्हा बँकेचे कर्ज घेतलेल्या व थकित झालेल्या ९...

read more
मनमाड करांच्या शिरपेचात अजून एक मानाचा तुरा तृप्ती पाराशर आकांक्षा व्यवहारे साईराज परदेशी आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड

मनमाड करांच्या शिरपेचात अजून एक मानाचा तुरा तृप्ती पाराशर आकांक्षा व्यवहारे साईराज परदेशी आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड

सुवा फिजी येथे १४ ते २१ सप्टेंबर २०१४ रोजी होणाऱ्या कॉमनवेल्थ चँपियनशिप साठी महाराष्ट्रातील एकमेव...

read more
कासलीवाल स्कूलमध्ये माता पालकांसाठी कुकिंग बॅटल (कुकिंग विदाऊट फ्लेम्स ) स्पर्धेचे आयोजन…..

कासलीवाल स्कूलमध्ये माता पालकांसाठी कुकिंग बॅटल (कुकिंग विदाऊट फ्लेम्स ) स्पर्धेचे आयोजन…..

नांदगांव : दि १३ मारुती जगधने दि.13 सप्टेंबर 2024 नांदगाव येथील जे. टी. कासलीवाल इंग्लिश मिडियम...

read more
लायन्स क्लब ऑफ मनमाड प्राइड व लायन्स क्लब ऑफ मनमाड सिटी यांच्या संयुक्त विद्यमाने एच.ए. के. हायस्कूल अँड ज्यु. कॉलेज,मनमाड मध्ये कर्करोग (कॅन्सर) जनजागृती कार्यक्रम संपन्न.

लायन्स क्लब ऑफ मनमाड प्राइड व लायन्स क्लब ऑफ मनमाड सिटी यांच्या संयुक्त विद्यमाने एच.ए. के. हायस्कूल अँड ज्यु. कॉलेज,मनमाड मध्ये कर्करोग (कॅन्सर) जनजागृती कार्यक्रम संपन्न.

  मनमाड :-लायन्स क्लब ऑफ मनमाड प्राइड,लायन्स क्लब ऑफ मनमाड सिटी व कॅन्सर सेंटर अमेरिका (CCA)...

read more
मनमाड महाविद्यालयाच्या रासेयो स्वयंसेवकांची जिल्हास्तरीय विविध स्पर्धे मध्ये यश

मनमाड महाविद्यालयाच्या रासेयो स्वयंसेवकांची जिल्हास्तरीय विविध स्पर्धे मध्ये यश

मनमाड महाविद्यालयाच्या रासेयो स्वयंसेवकांची जिल्हास्तरीय विविध स्पर्धे मध्ये यश महात्मा गांधी...

read more
.