loader image
[ays_poll id=7]

चांदवड तालुक्याचा ट्रिगर-1 मध्ये समावेश करावा – आमदार आहेर यांची मुख्यमंत्री व पालकमंत्र्यांकडे मागणी

Sep 29, 2026


राज्यातील २६८ तालुक्यांमध्ये खरीप हंगामासाठी ‘ट्रिगर-१’ लागू करून दुष्काळसदृश परिस्थिती जाहीर करण्यात आली असून चांदवड तालुक्यात गंभीर परिस्थिती असूनही तालुक्याचा या यादीत समावेश करण्यात आलेला नाही, या संदर्भात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांची भेट घेऊन चांदवड तालुक्यातील सद्यस्थितीची सविस्तर माहिती देत तालुक्यातील सर्व आठ महसूल मंडळांमधील प्रत्यक्ष पर्जन्यस्थिती आणि शेतीच्या नुकसानीची वस्तुस्थिती आमदार आहेर यांनी त्यांच्यासमोर मांडली.

केंद्र सरकारच्या Drought Management Manual 2016 मधील निकष तसेच चांदवड तालुक्यातील स्थानिक पर्जन्यमानाची आकडेवारी विचारात घेतल्यास तालुका दुष्काळ जाहीर करण्यासाठी पात्र ठरत असल्याचे स्पष्ट केले. यासंदर्भातील वस्तुस्थितीदर्शक मुद्दे आणि तांत्रिक आकडेवारी मुख्यमंत्री व पालकमंत्र्यांसमोर सादर करून त्यानुसार चांदवड तालुक्यात तातडीने ‘ट्रिगर-१’ लागू करण्याची मागणी केली.

चांदवड तालुक्यात साधारणपणे आठवड्याला सरासरी २९.०६ मिमी पाऊस अपेक्षित असतो. मात्र २ ते ३१ ऑगस्ट या कालावधीत कोणत्याही आठवड्यात अपेक्षित पावसाच्या ५० टक्के म्हणजेच १४.५३ मिमी इतकाही पाऊस झालेला नसल्याचे आकडेवारीतून स्पष्ट होते. तालुक्यात तब्बल ३० दिवसांचा ड्राय स्पेल नोंदविला गेला आहे. विशेष म्हणजे, संपूर्ण ऑगस्ट महिन्यात चांदवड तालुक्यात फक्त पाच दिवस सीमारेषेच्या आसपासचा म्हणजे २.५ मिमीपेक्षा किंचित अधिक पाऊस झाला, तर उर्वरित २६ दिवस पूर्णतः कोरडे गेले.

तालुक्यातील आठपैकी पाच मंडळांमध्ये सलग २१ दिवसांपेक्षा अधिक काळ २.५ मिमीपेक्षा कमी पाऊस झाल्याची नोंद आहे. उर्वरित तीन मंडळांमध्येही आठवड्याच्या सरासरी पर्जन्यमानाच्या ५० टक्क्यांपेक्षा कमी पाऊस राहिला आहे. त्यामुळे उपलब्ध पर्जन्यमानाच्या आकडेवारीचा विचार करता चांदवड तालुक्यातील सर्वच्या सर्व आठ मंडळांमध्ये दुष्काळी निकष लागू होत असल्याचे यावेळी नमूद केले.

पावसाचा प्रदीर्घ खंड आणि अत्यल्प पर्जन्यमानामुळे चांदवड तालुक्यातील खरीप हंगामातील पिकांवर मोठा परिणाम झाला असून मका, सोयाबीन आणि खरीप कांदा या पिकांना पावसाअभावी मोठा फटका बसला आहे. अनेक ठिकाणी पिके करपण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांनी मोठ्या खर्चाने उभी केलेली पिके पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या प्रत्यक्ष नुकसानीची नोंद होण्यासाठी तातडीने पंचनामे होणे आवश्यक असल्याचे यावेळी स्पष्ट केले.

चांदवड तालुक्यातील वस्तुस्थिती इतर दुष्काळसदृश तालुक्यांपेक्षा वेगळी नाही. उपलब्ध तांत्रिक आकडेवारी आणि प्रत्यक्ष पर्जन्यस्थितीचा विचार करून तालुक्याला मदतीपासून वंचित ठेवू नये, अशी भूमिका यावेळी मुख्यमंत्री आणि पालकमंत्र्यांसमोर मांडली.

चांदवड तालुक्यातील शेतकऱ्यांना तातडीचा दिलासा मिळण्यासाठी ‘ट्रिगर-१’ लागू करून सर्व आठ महसूल मंडळांमध्ये पिकांचे पंचनामे करण्याचे आदेश तातडीने द्यावेत, अशी आग्रही मागणी केली आहे.

यावेळी मा. आ. शिरीष कोतवाल, उपनगराध्यक्ष भूषण कासलीवाल, भाजपा तालुकाध्यक्ष मनोज शिंदे, काका काळे यांच्यासह पंढरीनाथ खताळ, बाळासाहेब माळी, योगेश ढोमसे, शांताराम भवर, गीता झाल्टे, डॉ. नितीन गांगुर्डे, वाल्मिक पवार, गणेश महाले, बाजीराव वानखेडे, गणपत ठाकरे, डॉ. भाऊराव देवरे, राजेश गांगुर्डे, देविदास आहेर, दीपक उशीर, मनोज कीरकाडे, नाना गुंजाळ, राजू पाटील, बापू शिंदे, अरुण देवडे यांच्यासह शिष्टमंडळातील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


अजून बातम्या वाचा..

शिवसेनेच्या तीव्र आंदोलनानंतर पिंपरखेड टोल नाका बंद; पगारवाढ आणि सुविधांसाठी एल्गार!

शिवसेनेच्या तीव्र आंदोलनानंतर पिंपरखेड टोल नाका बंद; पगारवाढ आणि सुविधांसाठी एल्गार!

​नांदगाव : प्रतिनिधी सुमितकुमार जगधने आमदार सुहास कांदे यांच्या मार्गदर्शनाखाली पिंपरखेड (ता....

read more
श्री निलमणी गणेश मंदीर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे गरीब रुग्णांना मोफत सेवेसाठी रु.1,09,000/- किंमतीची औषधे सेवा भारतीकडे सुपूर्द

श्री निलमणी गणेश मंदीर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे गरीब रुग्णांना मोफत सेवेसाठी रु.1,09,000/- किंमतीची औषधे सेवा भारतीकडे सुपूर्द

मनमाड - मनमाड शहरात धार्मिक, सांस्कृतिक, पर्यावरण, सामाजिक व शैक्षणिक आरोग्य सेवा क्षेत्रात सन...

read more
.