loader image
[ays_poll id=7]

रोजगार महाकुंभ’ भव्य रोजगार मेळावा उत्साहात संपन्न. ११ कंपन्यांचा सहभाग; 236 पेक्षा जास्त युवकांचे रजिस्ट्रेशन आणि जवळपास 162 युवकांची अंतरिम निवड

Sep 29, 2026


नाशिकच्या कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभाग आणि महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित, कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय (स्वायत्त), मनमाड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘रोजगार महाकुंभ – भव्य रोजगार मेळावा’ आज महाविद्यालयाच्या परिसरात उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.

महात्मा गांधी विद्यामंदिर, नाशिकचे समन्वयक डॉ. अपूर्व हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या या रोजगार मेळाव्यात विविध क्षेत्रातील ११ कंपन्यांनी सहभाग नोंदविला. या माध्यमातून सुमारे 236 विद्यार्थ्यांचे नोंदणी झाली त्यामध्ये 300 पदांसाठी रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात आल्या. या मध्ये 162 युवक युवतीला अंतरिम निवड करून रोजगार मेळाव्यात रोजगार संधी उपलब्ध रोजगार करून देण्यात आली.

मेळाव्यात UNO Minda (Khed City), Britannia Biscuit Ranjangaon, Britannia Dairy Ranjangaon, Beakart India Ranjangaon, Bajaj Auto, Neo Wheels Limited, Dividend Investment, Samarth Engineering आदी कंपन्यांनी सहभागी होत उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या. विविध कंपन्यांमध्ये Line Operator, Helper, Operator, Assembly Operator, Employee/Helper तसेच Mutual Funds and Shares यांसारख्या पदांसाठी उमेदवारांची निवड प्रक्रिया राबविण्यात आली.

या रोजगार मेळाव्यासाठी १०वी, १२वी, ITI, Diploma, Engineering तसेच विविध शाखांतील 236 युवक-युवतींनी सहभाग घेतला. ग्रामीण व निमशहरी भागातील युवकांना त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार रोजगाराच्या संधी एकाच ठिकाणी उपलब्ध झाल्याने उमेदवारांमध्ये उत्साहाचे वातावरण होते.

यावेळी उपस्थित कंपनी प्रतिनिधींनी उमेदवारांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार तसेच संबंधित पदांच्या आवश्यकतेनुसार मुलाखती व निवड प्रक्रिया घेतली. रोजगार मेळाव्यामुळे विद्यार्थ्यांना व युवकांना उद्योगक्षेत्रातील रोजगाराच्या संधी, आवश्यक कौशल्ये आणि विविध कंपन्यांमधील कार्यक्षेत्राची माहिती मिळाली.

“शिक्षणासोबतच कौशल्यविकास आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे ही काळाची गरज आहे. युवकांनी उपलब्ध संधींचा लाभ घेऊन आपल्या कौशल्यांना योग्य दिशा द्यावी,” असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य प्रमोद आंबेकर यांनी केले.

या मेळाव्यास नायब तहसीलदार श्री शिलावटे सर, मनमाड नगर परिषदेचे नगराध्यक्ष श्री योगेश पाटील मुख्याधिकारी श्री शेषराव चौधरी, मनमाड शहर गटनेते श्री महेंद्रभाऊ शिरसाठ, स्थानिक व्यवस्थापन समिती सदस्या श्रीमती अलकाताई शिंदे, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य श्री सुभाष अहिरे महाविद्यालयाचे कुलसचिव श्री समाधान केदारे, कार्यालयीन अधीक्षक एल. के. निकम, उपस्थित होते.

रोजगार मेळाव्याच्या यशस्वी आयोजनासाठी महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षक, प्रशासकीय कर्मचारी एन.सी.सी कॅडेट्स तसेच विद्यार्थी स्वयंसेवकांनी परिश्रम घेतले.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री विठ्ठल सातपुते, प्रास्ताविक श्री सागर मोहिते, (जिल्हा रोजगार अधिकारी नाशिक), तर आभार वरिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. बी. एस.देसले यांनी व्यक्त केले. मेळाव्याला युवकांचा मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद लक्षवेधी ठरला.


अजून बातम्या वाचा..

शिवसेनेच्या तीव्र आंदोलनानंतर पिंपरखेड टोल नाका बंद; पगारवाढ आणि सुविधांसाठी एल्गार!

शिवसेनेच्या तीव्र आंदोलनानंतर पिंपरखेड टोल नाका बंद; पगारवाढ आणि सुविधांसाठी एल्गार!

​नांदगाव : प्रतिनिधी सुमितकुमार जगधने आमदार सुहास कांदे यांच्या मार्गदर्शनाखाली पिंपरखेड (ता....

read more
श्री निलमणी गणेश मंदीर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे गरीब रुग्णांना मोफत सेवेसाठी रु.1,09,000/- किंमतीची औषधे सेवा भारतीकडे सुपूर्द

श्री निलमणी गणेश मंदीर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे गरीब रुग्णांना मोफत सेवेसाठी रु.1,09,000/- किंमतीची औषधे सेवा भारतीकडे सुपूर्द

मनमाड - मनमाड शहरात धार्मिक, सांस्कृतिक, पर्यावरण, सामाजिक व शैक्षणिक आरोग्य सेवा क्षेत्रात सन...

read more
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक अनिश्चित कालावधीसाठी प्रलंबित राहण्याची शक्यता

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक अनिश्चित कालावधीसाठी प्रलंबित राहण्याची शक्यता

राज्यातील 50 टक्के आरक्षण मर्यादा ओलंडलेल्या स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुका घेण्यास सुप्रीम...

read more
पत्रकार विद्यापीठासाठी रस्त्यावर उतरावे लागले तरी सोबत राहू — किरण नाईक  मनमाडमध्ये पत्रकार गुणगौरव व जीवनगौरव पुरस्कार सोहळा उत्साहात

पत्रकार विद्यापीठासाठी रस्त्यावर उतरावे लागले तरी सोबत राहू — किरण नाईक मनमाडमध्ये पत्रकार गुणगौरव व जीवनगौरव पुरस्कार सोहळा उत्साहात

मनमाड (प्रतिनिधी) : पत्रकारांसाठी स्वतंत्र पत्रकार विद्यापीठ उभारण्यासाठी नाशिक येथे जागा उपलब्ध...

read more
मनमाड येथे तालुक्यातील पत्रकारांचा गुणगौरव व ज्येष्ठ पत्रकारांचा जीवनगौरव पुरस्कार वितरण सोहळा

मनमाड येथे तालुक्यातील पत्रकारांचा गुणगौरव व ज्येष्ठ पत्रकारांचा जीवनगौरव पुरस्कार वितरण सोहळा

मनमाड : पत्रकार दिनानिमित्त नांदगाव–मनमाड मराठी पत्रकार संघातर्फे गुरुवार, ता. २९ जानेवारी रोजी...

read more
.