Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

भाजपच्या वतीने विकसित भारत कार्यक्रमाचे आयोजन

Oct 7, 2026

भारतीय जनता पक्षाच्या वतीने सुरू असलेल्या सेवा ज्योती यात्रेनिमित्त विकसित भारत कार्यक्रमाचे मनमाड येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात आयोजन करण्यात आले होते. बाजार समितीचे सभापती तसेच भारतीय जनता पक्षाचे विधानसभा प्रमुख गणेश धात्रक यांनी बाजार समितीत आपला शेतमाल घेऊन आलेल्या शेतकरी बांधव, व्यापारी, बाजार समिती कर्मचारी यांना केंद्र व राज्य शासनाच्या योजना व शेतकरी हितांच्या निर्णयांबाबत तसेच शासनाच्या कामकाजाबाबत माहिती दिली तसेच शेतकरी बांधवांचे शासन दरबारी प्रलंबित असलेल्या प्रकरणांबाबत शेतकऱ्यांनी माहिती उपलब्ध करून दिल्यास सदर प्रकरणांचा पाठपुरावा करून ते मार्गी लावण्याचा प्रयत्न करण्याचा शब्द देखील यावेळी धात्रक यांनी दिला.
यावेळी भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते उमाकांत राय, व्यापारी आघाडीचे जिल्हाध्यक्ष सचिन लुणावत, बाजार समिती संचालक सुभाष उगले, रमेश कराड, सुधाकर मोरे, माजी उपनगराध्यक्ष मुकुंद एळींजे, भाजपचे नारायण पवार सचिन संघवी मंडल प्रभारी जयकुमार फुलवाणी, नांदगाव तालुकाध्यक्ष मनीषा काकड, नांदगाव मंडल प्रभारी संदीप पगार, शहर सरचिटणीस सचिन कांबळे, युवा मोर्चाचे सुरज पवार, सनी फसाटे, निळकंठ त्रिभुवन, गणेश कासार, आनंद बोथरा, बाजार समिती सचिव बळीराम गायकवाड तसेच व्यापारी, बाजार समिती कर्मचारी व शेतकरी बांधव मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.

अजून बातम्या वाचा..

मराठा आरक्षणासाठी तालुक्यात नांदगांव मनमाड शहरासह सलग आठ दिवस सलग तिन तास रास्तारोको आंदोलन

मराठा आरक्षणासाठी तालुक्यात नांदगांव मनमाड शहरासह सलग आठ दिवस सलग तिन तास रास्तारोको आंदोलन

नांदगाव : मारूती जगधने दि २४ फेब्रुवारी ते २ मार्च पर्यंत सलग ८ दिवस रास्तारोको करण्याचा निर्णय...

read more
बाळासाहेबांच्या विचारांशी प्रामाणिक असलेला कडवट, सच्चा शिवसैनिक गमावला – मुख्यमंत्री शिंदे यांचेकडून शोक व्यक्त

बाळासाहेबांच्या विचारांशी प्रामाणिक असलेला कडवट, सच्चा शिवसैनिक गमावला – मुख्यमंत्री शिंदे यांचेकडून शोक व्यक्त

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, ज्येष्ठ नेते मनोहर जोशी सरांच्या निधनाचे वृत्त ऐकून अतिशय दुःख...

read more
भर बाजारपेठेत झालेल्या चोरी बाबत व्यापारी महासंघातर्फे पोलीस स्टेशनला निवेदन

भर बाजारपेठेत झालेल्या चोरी बाबत व्यापारी महासंघातर्फे पोलीस स्टेशनला निवेदन

मनमाड शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असणाऱ्या एकात्मता चौक येथील दुकानांमध्ये 21 फेब्रुवारीच्या रात्री...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]