Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

UPI पेमेंटवर आता शुल्कबाबत महत्वाचा निर्णय – दोन हजारांवरील व्यापारी व्यवहारांवर ०.४ टक्के शुल्क

Oct 13, 2026

मनमाड-
देशभरातील UPI चा वापर करणारे नागरिक आणि व्यापाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली असून दोन हजार रुपयांपेक्षा जास्त रकमेच्या निवडक व्यापारी UPI व्यवहारांवर ०.४ टक्के मर्चंट डिस्काउंट रेट अर्थात MDR शुल्क आकारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, सणासुदीचा काळ लक्षात घेऊन या निर्णयाची अंमलबजावणी दिवाळीनंतर करण्याचे NPCI ने जाहीर केले आहे.
सरकारने हे शुल्क १५ ऑक्टोबरपासून लागू करणार असल्याचे सुतोवाच केले होते मात्र, व्यापाऱ्यांची गैरसोय टाळण्यासाठी त्याची अंमलबजावणी पुढे ढकलण्यात आली असून, नवीन तारीख स्वतंत्रपणे जाहीर केली जाणार आहे.
नवीन नियमानुसार, दोन हजार रुपयांपेक्षा जास्त रकमेच्या पात्र व्यापारी व्यवहारांवर ०.४ टक्के MDR शुल्क आकारले जाईल. तर ७५ हजार रुपये किंवा त्याहून अधिक रकमेच्या व्यवहारांवर कमाल ३०० रुपये शुल्काची मर्यादा असेल.
महत्त्वाचे म्हणजे, हे शुल्क सर्वसामान्य ग्राहकांना भरावे लागणार नाही. एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीला UPI द्वारे पैसे पाठवण्याचे व्यवहार पूर्वीप्रमाणेच पूर्णपणे मोफत राहणार आहेत. तसेच लहान व्यापाऱ्यांच्या पात्र व्यवहारांनाही शुल्कातून सूट मिळणार आहे.
दरम्यान, या निर्णयामुळे डिजिटल व्यवहार करणाऱ्या व्यापाऱ्यांवर किती आर्थिक परिणाम होणार, याकडे आता व्यापारी वर्गाचे लक्ष लागले आहे

अजून बातम्या वाचा..

आंतरराष्ट्रीय खेळाडू मुकुंद संतोष आहेर साईराज राजेश परदेशी यांना महाराष्ट्र शासनाचा जिल्हा गुणवंत खेळाडू पुरस्कार जाहीर

आंतरराष्ट्रीय खेळाडू मुकुंद संतोष आहेर साईराज राजेश परदेशी यांना महाराष्ट्र शासनाचा जिल्हा गुणवंत खेळाडू पुरस्कार जाहीर

राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय वेटलिफ्टिंग स्पर्धांमध्ये सातत्याने उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मनमाड...

read more
पहलगाम घटनेचा मनमाड क्रिकेट प्रीमियर लीग च्या वतीने तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला

पहलगाम घटनेचा मनमाड क्रिकेट प्रीमियर लीग च्या वतीने तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला

दिनांक २२/०४/२०२५ रोजी जम्मू काश्मीर राज्यातील पहलगाममधिल बैसरण येथे विदेश.देशभरातिल राज्यातून...

read more
भीमोत्सव समिती आयोजित प्रसिद्ध खंजिरी वादक मीरा उमप यांच्या गीतांची मैफल संपन्न

भीमोत्सव समिती आयोजित प्रसिद्ध खंजिरी वादक मीरा उमप यांच्या गीतांची मैफल संपन्न

मनमाड - डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त भीमोत्सव आयोजन समितीच्या वतीने आयोजित करण्यात...

read more
कवयित्री प्रतिभा खैरनार यांच्या ‘वंशावळीच्या प्राचीन सरीतून’ काव्यसंग्रहाचे पुण्यात प्रकाशन

कवयित्री प्रतिभा खैरनार यांच्या ‘वंशावळीच्या प्राचीन सरीतून’ काव्यसंग्रहाचे पुण्यात प्रकाशन

  नांदगाव: मारुती जगधने येथील प्रसिद्ध कवयित्री,कथा लेखिका यांच्या 'वंशावळीच्या प्राचीन...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]