Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

संस्कार खेळवाडीत कन्यापूजन उत्साहात संपन्न

Oct 17, 2026

संस्कार खेळवाडी शाळेत कन्यापूजनाचा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमात कन्यांचे पाद्यपूजन करून त्यांना दक्षिणा व भेटवस्तू देण्यात आल्या. त्यानंतर सर्व बालकांना भोजन देण्यात आले.

या प्रसंगी बालकांना आपल्या जीवनातील महिलांचा आदर व सन्मान करण्याचे महत्त्व सांगण्यात आले. घरातील आजी, आई, काकू, आत्या, मावशी, बहीण, मैत्रीण, शिक्षिका तसेच घरकाम करणाऱ्या ताई यांचा नेहमी आदर केला पाहिजे आणि त्यांच्याशी सन्मानाने वागले पाहिजे, असा संदेश देण्यात आला. यावेळी सर्व बालकांनी कन्यांना नमस्कार करून त्यांच्याप्रती आदर व्यक्त केला.

या कार्यक्रमाचे आयोजन रूपाली बागुल, कोमल मिश्रा, रूपाली गागरे आणि उमेश कुलकर्णी यांनी केले. या उपक्रमातून बालकांमध्ये स्त्रीशक्तीविषयी आदर, सन्मान आणि संस्कारांची जाणीव निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला.

अजून बातम्या वाचा..

बांबूच्या काड्यांतून साकारला कष्टाचा आणि कौशल्याचा धडा – संस्कारखेळवाडीत कुटीरउद्योगाचे जिवंत प्रात्यक्षिक

बांबूच्या काड्यांतून साकारला कष्टाचा आणि कौशल्याचा धडा – संस्कारखेळवाडीत कुटीरउद्योगाचे जिवंत प्रात्यक्षिक

ग्रामीण जीवनातील स्वयंपूर्णतेची परंपरा आणि पारंपरिक कुटीरउद्योगाची ओळख बालकांना व्हावी, या...

read more
फ्रान्सच्या आकाशात मराठी शेतकऱ्याची भरारी; आंतरराष्ट्रीय फ्लाईंग फेस्टिव्हलमध्ये मंगेश दिघे यांची ऐतिहासिक कामगिरी

फ्रान्सच्या आकाशात मराठी शेतकऱ्याची भरारी; आंतरराष्ट्रीय फ्लाईंग फेस्टिव्हलमध्ये मंगेश दिघे यांची ऐतिहासिक कामगिरी

फ्रान्समधील ग्रेनोबलनजीक सेंट हिलारे येथे पार पडलेल्या ५३ व्या 'कुपेकार २०२६' या आंतरराष्ट्रीय...

read more
नार-पार-गिरणा नदीजोड प्रकल्पास केंद्राची मंजुरी – नांदगाव तालुक्याच्या पदरी निराशाच

नार-पार-गिरणा नदीजोड प्रकल्पास केंद्राची मंजुरी – नांदगाव तालुक्याच्या पदरी निराशाच

नाशिक आणि जळगाव या दोन जिल्ह्यांसाठी अत्यंत उपयुक्त अशा नार-पार-गिरणा नदीजोड प्रकल्पाला केंद्र...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]