Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

सुट्टीचा आनंद बाजूला ठेवत ‘कमवा आणि शिका’चा अनोखा दीपोत्सव!

Nov 7, 2026

मनमाड – *प्रकृती स्कूलच्या* विद्यार्थ्यांनी मनमाड शहरात फुलवला स्वावलंबनाचा आणि उद्योजकतेचा प्रकाश.दिवाळीच्या सुट्ट्या म्हटल्या की विद्यार्थ्यांसाठी आनंद, खेळ, मौजमजा आणि फिरण्याचे दिवस! मात्र याच सुट्टीच्या काळात इतर विद्यार्थ्यांच्या आनंदापेक्षा काहीतरी वेगळे आणि प्रेरणादायी करण्याचा ध्यास प्रकृती स्कूलच्या इयत्ता सहावी व सातवीच्या विद्यार्थ्यांनी घेतला आहे.

दिवाळीच्या सुट्ट्यांचा सदुपयोग करत प्रकृती स्कूलच्या विद्यार्थ्यांनी ‘कमवा आणि शिका’ या अभिनव उपक्रमातून मनमाड शहरात ठिकठिकाणी आपापले छोटे छोटे स्टॉल उभारून विविध वस्तूंची विक्री सुरू केली आहे. शाळेचे मुख्याध्यापक माननीय सौरभ जैन सर यांनी विद्यार्थ्यांना दिलेल्या भांडवलाच्या आधारे विद्यार्थ्यांनी स्वतः पुढाकार घेत हा व्यावसायिक उपक्रम प्रत्यक्षात आणला आहे.हा उपक्रम केवळ वस्तू विक्रीपुरता मर्यादित नसून विद्यार्थ्यांसाठी एक प्रकारची खुली जीवनशाळाच ठरत आहे. ग्राहकांशी नम्रपणे संवाद साधणे, वस्तूंची माहिती देणे, पैशांचे व्यवहार करणे, खरेदी-विक्रीचे गणित समजून घेणे, नफा-तोट्याची संकल्पना जाणून घेणे, तसेच समाजातील विविध स्तरांतील लोकांशी आत्मविश्वासाने वागणे अशा अनेक जीवनोपयोगी कौशल्यांचे धडे विद्यार्थी प्रत्यक्ष अनुभवातून घेत आहेत.पुस्तकी ज्ञानाबरोबरच व्यवहारज्ञान, आर्थिक साक्षरता, स्वावलंबन, नेतृत्वगुण, संवादकौशल्य आणि उद्योजकतेची बीजे विद्यार्थ्यांमध्ये रुजविण्याचा हा एक स्तुत्य प्रयत्न आहे. विशेष म्हणजे, विद्यार्थ्यांनी स्वतःच्या हिमतीवर आणि मेहनतीवर उभा केलेला हा छोटासा व्यवसाय त्यांच्या चेहऱ्यावर वेगळाच आत्मविश्वास आणि समाधान निर्माण करत आहे.

या उपक्रमातील सर्वात प्रेरणादायी बाब म्हणजे शाळेचे मुख्याध्यापक तसेच शाळेतील शिक्षक आणि प्रशासकीय कर्मचारी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांच्या स्टॉल्सना वैयक्तिकरित्या भेट देऊन त्यांची विचारपूस करत आहेत. विद्यार्थ्यांचे कौतुक करून त्यांना प्रोत्साहन देणे, त्यांच्या अडचणी समजून घेणे आणि त्यांच्या प्रयत्नांना बळ देणे, ही त्यांची कृती विद्यार्थ्यांसाठी निश्चितच प्रेरणादायी ठरत आहे.

कारण शिक्षण म्हणजे केवळ वर्गातील चार भिंतींमध्ये मिळणारे ज्ञान नव्हे, तर जीवनातील प्रत्येक परिस्थितीला आत्मविश्वासाने सामोरे जाण्याची तयारी होय!

प्रकृती स्कूलचा हा उपक्रम विद्यार्थ्यांना केवळ आजचा विद्यार्थी न बनवता उद्याचा आत्मनिर्भर, जबाबदार आणि सक्षम नागरिक घडविण्याच्या दिशेने टाकलेले एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरत आहे.

“ दिवाळीच्या दिव्यांसोबत विद्यार्थ्यांच्या स्वप्नांनाही मिळाली स्वावलंबनाची नवी ज्योत; कमवा आणि शिका उपक्रमातून उजळले अनुभवाचे अनोखे क्षितिज!”

अजून बातम्या वाचा..

तक्रार करूनही प्रशासनाचे दुर्लक्ष – एफ.सी.आय रोड परिसरातील नागरिक आंदोलनाच्या पावित्र्यात !

तक्रार करूनही प्रशासनाचे दुर्लक्ष – एफ.सी.आय रोड परिसरातील नागरिक आंदोलनाच्या पावित्र्यात !

मनमाड शहरातील प्रभाग क्र.३ मधील एफ.सी.आय.रोड परिसरात सध्या सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरलेले असून...

read more
नाशिक परिमंडळामध्ये सुरक्षा ठेवीच्या व्याजापोटी परतावा;८ लाख ७९ हजार लघुदाब वीजग्राहकांना ६ कोटी ६८ लाख रुपये जमा

नाशिक परिमंडळामध्ये सुरक्षा ठेवीच्या व्याजापोटी परतावा;८ लाख ७९ हजार लघुदाब वीजग्राहकांना ६ कोटी ६८ लाख रुपये जमा

वीज कायदा २००३ नुसार सुरक्षा ठेव भरणे वीज ग्राहकांसाठी बंधनकारक असून, ग्राहकांचा वार्षिक वीज वापर...

read more
उध्दव ठाकरे मुख्यमंत्री व्हावेत म्हणून त्याने तब्बल पावणे सात कोटी वेळा केला प्रभू श्री रामाचा जप (बघा व्हिडियो)

उध्दव ठाकरे मुख्यमंत्री व्हावेत म्हणून त्याने तब्बल पावणे सात कोटी वेळा केला प्रभू श्री रामाचा जप (बघा व्हिडियो)

शिवसेनेचे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री व्हावेत म्हणून एका कट्टर शिवसैनिकाने २०१३ पासून तब्बल ६ कोटी ७५...

read more
कला क्षेत्रातील वैशिष्ट्यपूर्ण योगदानाबद्दल श्री देविदास शिवराम हिरे यांचा गौरव

कला क्षेत्रातील वैशिष्ट्यपूर्ण योगदानाबद्दल श्री देविदास शिवराम हिरे यांचा गौरव

इंडिपेंडंट सेकंडरी अँड हायर सेकंडरी टीचर्स युनियन महाराष्ट्र राज्य( इस्तू) तर्फे नवव्या वर्धापन...

read more
नांदगाव तालुक्यातील बोराळे या गावात प्रचंड वादळासह सोसाटयाच्या वाऱ्याने शेकडो एकर केळीच्या बागा भुईसपाट

नांदगाव तालुक्यातील बोराळे या गावात प्रचंड वादळासह सोसाटयाच्या वाऱ्याने शेकडो एकर केळीच्या बागा भुईसपाट

नांदगाव (सोमनाथ घोंगाणे) : याबाबत अधिक माहीती अशी काही नांदगाव तालुक्यातील पुर्वेस ३० किलोमिटर वर...

read more
बारावीच्या निकालात सर्व विभागात मुलींची बाजी : छत्रे हायस्कूल ची साक्षी चौधरी केंद्रात प्रथम

बारावीच्या निकालात सर्व विभागात मुलींची बाजी : छत्रे हायस्कूल ची साक्षी चौधरी केंद्रात प्रथम

शैक्षणिक वर्ष २०२१/२२ मार्च,एप्रिल मध्ये झालेल्या इयत्ता १२वी बोर्ड परीक्षेचा ऑनलाईन निकाल आज...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]