loader image
[ays_poll id=7]

मिलिंद नार्वेकरांची तिरुपती देवस्थान ट्रस्टच्या सदस्यपदी नियुक्ती !

Sep 16, 2021

देशातील सर्वाधिक लोकप्रिय आणि श्रीमंत देवस्थान तिरुमला तिरुपती देवस्थान ट्रस्टच्या सदस्यांची यादी काल आंध्र प्रदेश सरकारने  जाहीर केली. या यादीत देशभरातून 24 व्यक्तींची नियुक्ती केली जाते. महाराष्ट्रातून या यादीत शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांची  सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वाय एस जगनमोहन रेड्डी यांच्याशी फोनवरुन संवाद साधला. त्यानंतर महाराष्ट्रातून मिलिंद नार्वेकर यांची अधिकृत नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे.

देशातील सर्वात प्रतिष्ठित म्हणून आंध्र प्रदेशातील तिरुमला येथील तिरुपती देवस्थानाची ख्याती आहे. या देवस्थानाच्या ट्रस्ट सदस्यांच्या नियुक्तीसाठी देशभरातून मोठी चढाओढ असते. मात्र प्रत्येक राज्याचे मुख्यमंत्री थेट आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधून ही नियुक्ती सुचवत असतात.

आंध्र प्रदेश सरकारने त्याप्रमाणे काल अधिकृत अधिसूचना काढत तिरुमला तिरुपती देवस्थान ट्रस्टच्या नवीन सदस्यांच्या नावांची यादी जाहीर केली. शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांच्या खांद्यावर याआधीच मुंबई क्रिकेट संघटनेच्या मुंबई प्रीमिअर लीग (MPL) गव्हर्निंग कौन्सिलच्या अध्यक्षपदाची धुरा आहेच. त्यानंतर आता देशातील सर्वात श्रीमंत देवस्थानाच्या ट्रस्टवर सदस्य म्हणून मिलिंद नार्वेकर यांची नियुक्ती जाहीर झाली आहे. त्यामुळे शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांचं वलय आता देश पातळीवर विस्तारल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.

मिलिंद नार्वेकरांचा अल्पपरिचय

मिलिंद नार्वेकर हे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे विश्वासू सहकारी आहेत. गटप्रमुख ते उद्धव ठाकरेंचे सचिव ते आता शिवसेना सचिव असा मिलिंद नार्वेकरांचा राजकीय प्रवास राहिला आहे. मुंबई प्रीमिअर लीगच्या गव्हर्निंग कौन्सिलचे अध्यक्ष म्हणून गेल्याच वर्षी मिलिंद नार्वेकर यांची निवड झाली.

मिलिंद नार्वेकर काही वर्षांपूर्वी मातोश्रीवर शाखाप्रमुख पदाच्या मुलाखतीसाठी गेले होते. त्यावेळेस उद्धव ठाकरे यांची नजर मिलिंद नार्वेकरांवर गेली. मिलिंद नार्वेकर यांच्यातील हुशारी, संवाद कौशल्य या गुणांमुळे मिलिंद नार्वेकरांची उद्धव ठाकरेंच्या पीए म्हणून निवड झाली. तेव्हापासून ते आजतायागत नार्वेकर हे अनेक जबाबदाऱ्या उत्तमरित्या पार पाडत आहेत.

अजून बातम्या वाचा..

बघा व्हिडिओ : कसाऱ्याच्या पुढे पंचवटी एक्सप्रेसचे कपलिंग तुटली – काही अंतरावर जाऊन इंजिन आणि डबा थांबल्याने पुढील अनर्थ टळला

बघा व्हिडिओ : कसाऱ्याच्या पुढे पंचवटी एक्सप्रेसचे कपलिंग तुटली – काही अंतरावर जाऊन इंजिन आणि डबा थांबल्याने पुढील अनर्थ टळला

मनमाड – मनमाड हून मुंबई येथे रोज जाणारी पंचवटी एक्सप्रेस ही कसारा स्टेशन जवळ कपलिंग तुटल्याने...

read more
बघा व्हिडिओ – विश्वविजेत्या भारतीय क्रिकेट संघाने पंतप्रधान मोदी यांची घेतली भेट

बघा व्हिडिओ – विश्वविजेत्या भारतीय क्रिकेट संघाने पंतप्रधान मोदी यांची घेतली भेट

विश्वविजेत्या भारतीय क्रिकेट संघाने आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. यावेळी पंतप्रधान...

read more
मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी अडवणूक, दिरंगाई, पैशांची मागणी केल्यास कठोर कारवाई -मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचना

मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी अडवणूक, दिरंगाई, पैशांची मागणी केल्यास कठोर कारवाई -मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचना

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचना योजनेच्या पारदर्शक, गतिमान अंमलबजावणीसाठी प्रत्येक जिल्ह्यात...

read more
चार चोरट्यांच्या मुसक्या आवळत चोरीच्या २३ दुचाकी हस्तगत – मनमाड पोलिसांची दमदार कामगिरी

चार चोरट्यांच्या मुसक्या आवळत चोरीच्या २३ दुचाकी हस्तगत – मनमाड पोलिसांची दमदार कामगिरी

मनमाड - मनमाड शहर पोलिसांनी मोठी चोरीच्या २३ दुचाकी जप्त ४ जणांना अटक करत मोठी कामगिरी केली आहे....

read more
एच.ए. के. हायस्कूल अँड ज्यु. कॉलेज, मनमाड चे ग्रंथपाल मन्सूरी अ.हमीद यांचा सेवापुर्ती सोहळा संपन्न.

एच.ए. के. हायस्कूल अँड ज्यु. कॉलेज, मनमाड चे ग्रंथपाल मन्सूरी अ.हमीद यांचा सेवापुर्ती सोहळा संपन्न.

  मनमाड :-एच.ए. के. हायस्कूल अँड ज्यु. कॉलेज, मनमाड चे ग्रंथपाल मन्सूरी अ. हमीद सक्रोद्दीन हे...

read more
मिशन विधानसभा – मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची अर्थमंत्री अजित पवारांकडून घोषणा

मिशन विधानसभा – मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची अर्थमंत्री अजित पवारांकडून घोषणा

मुंबई, 28 जून : राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या आजच्या दुसऱ्या दिवशी राज्याचे अर्थमंत्री...

read more
जात वैधता कसोट्यांमध्ये सगे सोयरे शब्दाचा समावेश करू नये – नांदगाव सकल ओ बी सी समाजाची मागणी

जात वैधता कसोट्यांमध्ये सगे सोयरे शब्दाचा समावेश करू नये – नांदगाव सकल ओ बी सी समाजाची मागणी

नांदगाव - ओ बी सी भटक्या विमुक्त जाती जमातीचे कार्यकर्ते प्रा. लक्ष्मणराव हाके व नवनाथ (आबा)...

read more
के आर टी हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज मध्ये आंतरराष्ट्रीय योगा दिन मोठ्या उत्साहात साजरा.

के आर टी हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज मध्ये आंतरराष्ट्रीय योगा दिन मोठ्या उत्साहात साजरा.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे प्राचार्य मुकेश मिसर यांनी योगा दिनानिमित्त विद्यार्थ्यांना...

read more
.