loader image
[ays_poll id=7]

पाकिस्तानची नाचक्की – न्यूझीलंडकडून सा्मना रद्द!

Sep 17, 2021


पाकिस्तान-न्यूझीलंडल वनडे सीरिज रद्द करण्यात आली आहे. सुरक्षेच्या कारणास्तव ही सीरिज रद्द करण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. त्यामुळे रावळपिंडी वन डे सुरु होण्याआधीच मॅच रद्द करण्यात आली आहे. पहिल्या सामन्याचा टॉस होण्याच्या अर्धा तास आधीच मॅच रद्द करण्यात आली. 3 वनडे आणि 5 टी-ट्वेंटी मॅचेसची सिरीज रद्द झाली आहे. न्यूझीलंड संघ आता परत मायदेशी जाणार आहे. विशेष म्हणजे न्यूझीलंड टीम तब्बल 18 वर्षांनी पाकिस्तानच्या दौऱ्यावर होती. संपूर्ण संघ 12 सप्टेंबरला पाकिस्तानात पोहोचला होता. सर्व संघाला कडक पोलीस बंदोबस्तात इस्लामापूर विमानतळावरुन हॉटेलमध्ये घेऊन जाण्यात आलं होतं. पीसीबीने न्यूझीलंड आणि त्यांच्या खेळाडूंसाठी हॉटेलमध्ये बायो बबलची व्यवस्था केली होती.

नेमकं प्रकरण काय?
पाकिस्तान क्रिकेटवर संकटाचे ढग पुन्हा दाटून आले आहेत. न्यूझीलंडचा पूर्ण पाकिस्तान दौरा सुरक्षेच्या कारणास्तव रद्द करण्यात आला आहे. या दौऱ्यात पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात 3 वनडे आणि 5 टी-ट्वेंटी सामने खेळवण्यात येणार होते. वनडे सीरिजने या दौऱ्याला सुरुवात होणार होती. त्यातील पहिला वनडे सामना आज (17 सप्टेंबर) खेळवण्यात येणार होता. मात्र, पहिल्याच सामन्याच्या टॉस होण्याच्या 20 मिनिटांआधीच हा सामना रद्द करण्यात आला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काहितरी विपरीत होणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर न्यूझीलंडच्या खेळाडूंनी मैदानात खेळण्यास नकार दिला.


अजून बातम्या वाचा..

दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत दोन लष्करी अधिकारी व पोलीस कर्मचारी शहीद – अनंतनाग येथील घटना

दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत दोन लष्करी अधिकारी व पोलीस कर्मचारी शहीद – अनंतनाग येथील घटना

  जम्मू-काश्मीरच्या अनंतनागमध्ये दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत दोन लष्करी अधिकारी, पोलीस ठार...

read more
नांदगाव तालुकास्तरीय शालेय मैदानी स्पर्धेत संत झेवियर हायस्कूलच्या खेळाडूंचे घवघवीत यश

नांदगाव तालुकास्तरीय शालेय मैदानी स्पर्धेत संत झेवियर हायस्कूलच्या खेळाडूंचे घवघवीत यश

मनमाड :शालेय शिक्षण व क्रीडा विभाग , क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे व जिल्हा...

read more
मनमाड येथे रविवारी रंगणार जिल्हास्तरीय बास्केट बॉल स्पर्धा – संत झेविअर हायस्कूल चा पुढाकार

मनमाड येथे रविवारी रंगणार जिल्हास्तरीय बास्केट बॉल स्पर्धा – संत झेविअर हायस्कूल चा पुढाकार

मनमाड : झेवियर्स स्पोट् र्स क्लब मनमाड व प्रिन्सी मेमोरियल फाउंडेशन( पुणे)द्वारा आयोजित...

read more
.