loader image

भारत सरकार मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती योजनेसाठी अर्ज प्रक्रिया सुरू..

Sep 21, 2021


नाशिक :- शैक्षणिक वर्ष 2020-21 करीता मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी महाडीबीटी या
संकेतस्थळावर अर्ज सादर करण्यासाठी 30 सप्टेंबर 2021 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली
आहे. सदर शिष्यवृत्तीचा लाभ मिळण्यासाठी विद्यार्थ्यांनी त्वरीत ऑनलाईन अर्ज सादर
करण्याचे आवाहन सहाय्य‍क आयुक्त समाज कल्याण नाशिक सुंदरसिंग वसावे यांनी
शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.
शासकीय प्रसिद्धीपत्रकात नमूद केल्यानुसार, या शिष्यवृत्तीसाठी शैक्षणिक वर्ष 2021-22
मध्ये महाविद्यालयात प्रवेश घेतलेले व शिष्यवृत्ती योजनेचा लाभ घेण्यास इच्छुक असलेले
अनुसूचित जाती, विमुक्त जाती व भटक्या जमाती, इतर मागास प्रवर्ग , विशेष मागास
प्रवर्ग असेलेल्या विद्यार्थ्यांनी त्यांचे अर्ज https://mahadbtmahait.gov.in या
संकेतस्थळावर सादर करण्याविषयी कळविण्यात आले आहे.
या संदर्भात सर्व महाविद्यालयांनी त्यांच्या स्तरावर विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करावी.
तसेच महाविद्यालयांनी महाविद्यालय स्तरावर प्रलंबित असणारे शिष्यवृतीचे अर्ज त्वरीत
ऑनलाईन प्रणालीतून तपासून सहाय्यक आयुक्त समाज कल्याण नाशिक या कार्यालयाकडे
वर्ग करावे. असेही, वसावे यांनी शासकीय प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.


अजून बातम्या वाचा..

बुरुकुलवाडी सबस्टेशन जवळ अस्तगाव रोडवरील पांझन नदी पुलाजवळ सुरक्षा कठडे लावावेत – संजय दराडे

बुरुकुलवाडी सबस्टेशन जवळ अस्तगाव रोडवरील पांझन नदी पुलाजवळ सुरक्षा कठडे लावावेत – संजय दराडे

  मनमाड – स्थानिक नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या अस्तगाव...

read more
नांदगाव, मारुती जगधने ६ मे 2025 तालुक्यातील उपलब्ध जलसाठे,त्यातील क्षमता, व शेती सिंचनाच्या दृष्टीने संबंधित अधिकाऱ्यांसोबत आमदार सुहास कांदे यांची आढावा बैठक संपन्न.

नांदगाव, मारुती जगधने ६ मे 2025 तालुक्यातील उपलब्ध जलसाठे,त्यातील क्षमता, व शेती सिंचनाच्या दृष्टीने संबंधित अधिकाऱ्यांसोबत आमदार सुहास कांदे यांची आढावा बैठक संपन्न.

  तालुक्यात दोनशेच्या वर पाझर तलाव बंधारे लहान मोठे धरणे असून त्यातील गाळ काढून आहे त्या...

read more
.