loader image
[ays_poll id=7]

पोटनिवडणुकीत आघाडीत बिघाडी – पालघरमध्ये भाजप, मनसे युती !

Oct 1, 2021


अकोला आणि वाशीम जिल्ह्यांत जिल्हा परिषद व पंचायत समिती पोटनिवडणुकीच्या रणधुमाळीत महाविकास आघाडीत फूट पडली आहे. राज्यात सत्तेसाठी एकत्र आलेले पक्ष पोटनिवडणुकीत मात्र एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले आहेत. अकोल्यात निवडणुकीसाठी शिवसेना व राष्ट्रवादी एकत्र आले आहेत, तर काँग्रेसने ‘एकला चलो रे’चा नारा देत उमेदवार उभे केले आहेत. वाशीम जिल्ह्यात वंचित व जनविकास आघाडीची युती असून इतर पक्ष स्वबळावर निवडणूक रिंगणात उतरले आहेत. प्रत्येक मतदारसंघामध्ये तिरंगी-चौरंगी लढती रंगणार असल्याचे चित्र आहे.

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार अधिक आरक्षण होत असल्याने नागरिकांच्या मागास प्रवर्गाच्या जागा रिक्त ठरविण्यात आल्या. त्या जागा सर्वसाधारण प्रवर्गातून भरण्यासाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला. या पोटनिवडणुकीत ५ ऑक्टोबरला मतदान व ६ ऑक्टोबरला मतमोजणी होणार आहे. अकोला व वाशीम जिल्हा परिषदेच्या प्रत्येकी १४ रिक्त गटांसाठी, तर अनुक्रमे २८ व २७ पंचायत समितीच्या गणांसाठी पोटनिवडणूक होत आहे. या निवडणुकीसाठी उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध झाली. चिन्हांचेही वाटप करण्यात आले आहे. प्रचार मोहिमेला सुरुवात झाली असून नेत्यांचे दौरे सुरू झाले आहेत.

पोटनिवडणुकीमध्ये राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडी एकत्रितपणे निवडणुकीला सामोरे जाणार का? यावरून राजकीय वर्तुळात चर्चा रंगली होती. अनेक मोठ्या नेत्यांनी आम्ही एकत्रितपणे निवडणुकांना सामोरे जाऊ, असे वारंवार जाहीर केले. मात्र, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी निवडणुकीसाठी स्वबळाची घोषणा केली. त्यावरून सत्ताधारी शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेस पक्षामध्ये उलटसुलट चर्चादेखील रंगली. अखेर काँग्रेस पक्षाने ‘एकला चलो रे’ची भूमिका घेत स्वतंत्रपणे आपले उमेदवार पोटनिवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहेत. राज्यात सत्तेचे समीकरण जुळवण्यासाठी एकत्र आलेले तिन्ही पक्ष निवडणुका मात्र परस्परविरोधी लढत आहेत. त्यामुळे मतविभाजन होण्याची शक्यता आहे. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या घोषणेनुसार स्वबळावर पोटनिवडणूक लढण्यासाठी अकोला जिल्ह्यात काँग्रेसने सुरुवातीपासून हालचाली केल्या. काँग्रेसने १२ गटांमध्ये, तर २३ गणांमध्ये स्वतंत्रपणे आपले उमेदवार दिले आहेत. शिवसेना व राष्ट्रवादीने आघाडी केली. भाजप आणि वंचित बहुजन आघाडी स्वबळावर रिंगणात असून, त्यांनी सर्व जागांवर उमेदवार दिले आहेत. अकोला जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी चौरंगी, तर काही ठिकाणी तिरंगी लढत होत आहे. प्रमुख पक्षांना निवडक मतदारसंघांमध्ये बंडखोरीचा फटका बसण्याची शक्यता आहे. वाशीम जिल्ह्यातसुद्धा जिल्हा परिषद पोटनिवडणुकीमध्ये महाविकास आघाडीत बिघाडी झाली आहे. शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेसच्या उमेदवारांनी अर्ज दाखल केले. दुसरीकडे आघाडीसंदर्भात स्थानिक स्तरावर बोलणी सुरूच होती. अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत जिल्ह्यातील नेत्यांमध्ये आघाडी करण्यासंदर्भात चर्चेच्या फैरी झडल्या. मात्र, अंतिम क्षणापर्यंत महत्त्वाच्या काही जागावाटपाचा तिढा सुटला नाही.

अखेर पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीला मूठमाती देत पक्षांनी स्वबळावर उमेदवार रिंगणात उतरवले आहेत. भाजपही स्वबळावरच निवडणूक लढत आहे. 

इकडे पालघर पोटनिवडणुकीत भाजप आणि मनसे दोघांमध्ये युवी झाली असून हीच युती पुढे महानगरपालिका, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकी पर्यंत कायम राहते का, हा राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहे.


अजून बातम्या वाचा..

बघा व्हिडिओ : कसाऱ्याच्या पुढे पंचवटी एक्सप्रेसचे कपलिंग तुटली – काही अंतरावर जाऊन इंजिन आणि डबा थांबल्याने पुढील अनर्थ टळला

बघा व्हिडिओ : कसाऱ्याच्या पुढे पंचवटी एक्सप्रेसचे कपलिंग तुटली – काही अंतरावर जाऊन इंजिन आणि डबा थांबल्याने पुढील अनर्थ टळला

मनमाड – मनमाड हून मुंबई येथे रोज जाणारी पंचवटी एक्सप्रेस ही कसारा स्टेशन जवळ कपलिंग तुटल्याने...

read more
बघा व्हिडिओ – विश्वविजेत्या भारतीय क्रिकेट संघाने पंतप्रधान मोदी यांची घेतली भेट

बघा व्हिडिओ – विश्वविजेत्या भारतीय क्रिकेट संघाने पंतप्रधान मोदी यांची घेतली भेट

विश्वविजेत्या भारतीय क्रिकेट संघाने आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. यावेळी पंतप्रधान...

read more
मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी अडवणूक, दिरंगाई, पैशांची मागणी केल्यास कठोर कारवाई -मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचना

मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी अडवणूक, दिरंगाई, पैशांची मागणी केल्यास कठोर कारवाई -मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचना

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचना योजनेच्या पारदर्शक, गतिमान अंमलबजावणीसाठी प्रत्येक जिल्ह्यात...

read more
चार चोरट्यांच्या मुसक्या आवळत चोरीच्या २३ दुचाकी हस्तगत – मनमाड पोलिसांची दमदार कामगिरी

चार चोरट्यांच्या मुसक्या आवळत चोरीच्या २३ दुचाकी हस्तगत – मनमाड पोलिसांची दमदार कामगिरी

मनमाड - मनमाड शहर पोलिसांनी मोठी चोरीच्या २३ दुचाकी जप्त ४ जणांना अटक करत मोठी कामगिरी केली आहे....

read more
एच.ए. के. हायस्कूल अँड ज्यु. कॉलेज, मनमाड चे ग्रंथपाल मन्सूरी अ.हमीद यांचा सेवापुर्ती सोहळा संपन्न.

एच.ए. के. हायस्कूल अँड ज्यु. कॉलेज, मनमाड चे ग्रंथपाल मन्सूरी अ.हमीद यांचा सेवापुर्ती सोहळा संपन्न.

  मनमाड :-एच.ए. के. हायस्कूल अँड ज्यु. कॉलेज, मनमाड चे ग्रंथपाल मन्सूरी अ. हमीद सक्रोद्दीन हे...

read more
मिशन विधानसभा – मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची अर्थमंत्री अजित पवारांकडून घोषणा

मिशन विधानसभा – मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची अर्थमंत्री अजित पवारांकडून घोषणा

मुंबई, 28 जून : राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या आजच्या दुसऱ्या दिवशी राज्याचे अर्थमंत्री...

read more
जात वैधता कसोट्यांमध्ये सगे सोयरे शब्दाचा समावेश करू नये – नांदगाव सकल ओ बी सी समाजाची मागणी

जात वैधता कसोट्यांमध्ये सगे सोयरे शब्दाचा समावेश करू नये – नांदगाव सकल ओ बी सी समाजाची मागणी

नांदगाव - ओ बी सी भटक्या विमुक्त जाती जमातीचे कार्यकर्ते प्रा. लक्ष्मणराव हाके व नवनाथ (आबा)...

read more
के आर टी हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज मध्ये आंतरराष्ट्रीय योगा दिन मोठ्या उत्साहात साजरा.

के आर टी हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज मध्ये आंतरराष्ट्रीय योगा दिन मोठ्या उत्साहात साजरा.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे प्राचार्य मुकेश मिसर यांनी योगा दिनानिमित्त विद्यार्थ्यांना...

read more
.