loader image
[ays_poll id=7]

ज्येष्ठ साहित्यिक द. मा. मिरासदार यांचं निधन

Oct 3, 2021

मराठीतील ज्येष्ठ साहित्यिक दत्ताराम मारुती उर्फ द. मा. मिरासदार यांचं निधन झालं. मराठी साहित्यात विनोदी लेखन आणि कथाकथनामुळे ते वाचकप्रिय ठरले. द. मा मिरासदारांचा जन्म 14 एप्रिल 1927 रोजी सोलापूर जिल्ह्यातील अकलूज इथं झाला. पत्रकारितेपासून त्यांनी साहित्यसेवेस सुरुवात केली.

पुण्यात काही काळ पत्रकारिता केल्यानंतरते अध्यापन क्षेत्राकडे वळले. 1961 ते 1987 या काळात औरंगाबादमधील देवगिरी महाविद्यालय आणि पुण्यातील गरवारे महाविद्यालयात त्यांनी मराठीचे प्राध्यापक म्हणून काम केलं. 1950 मध्ये ‘सत्यकथा’ मासिकात प्रसिद्ध झालेल्या ‘रानमाणूस’ या पहिल्याच कथेपासून त्यांच्या लेखन कारकीर्दीला सुरुवात झाली.

द. मा. मिरासदारांच्या कथांमध्ये ग्रामीण भागाचं कथानक असे. कथांमधील पात्रांना ते अत्यंत विनोदी पद्धतीनं मांडत. तितकचं तीव्रतेनं ते त्या पात्रांना कथाकथनामधून प्रेक्षकांसमोर सादर करत. विनोदी लेखनासाठी प्रसिद्ध असलेल्या मिरासदारांनी स्पर्श, विरंगुळा आणि कोणे एके काळी यांसारख्या गंभीर कथाही लिहिल्या.

1998 साली परळी-वैजनाथ इथं आयोजित केलेल्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे ते अध्यक्षही होते. मिरासदारांनी संवादलेखन केलेल्या ‘एक डाव भुताचा’ आणि ‘ठकास महाठक’ या दोन सिनेमांना अनेक पारितोषिके मिळाली. तसंच, महाराष्ट्र राज्याचा विंदा जीवनगौरव पुरस्कार (2015) मिळाला. प्राचार्य शिवाजीराव भोसले स्मृती पुरस्कारानेही 2014 साली त्यांना गौरवण्यात आले होते.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी ट्विटरवरून मिरासदारांना आदरांजली वाहिली.

अजून बातम्या वाचा..

बघा व्हिडिओ : कसाऱ्याच्या पुढे पंचवटी एक्सप्रेसचे कपलिंग तुटली – काही अंतरावर जाऊन इंजिन आणि डबा थांबल्याने पुढील अनर्थ टळला

बघा व्हिडिओ : कसाऱ्याच्या पुढे पंचवटी एक्सप्रेसचे कपलिंग तुटली – काही अंतरावर जाऊन इंजिन आणि डबा थांबल्याने पुढील अनर्थ टळला

मनमाड – मनमाड हून मुंबई येथे रोज जाणारी पंचवटी एक्सप्रेस ही कसारा स्टेशन जवळ कपलिंग तुटल्याने...

read more
बघा व्हिडिओ – विश्वविजेत्या भारतीय क्रिकेट संघाने पंतप्रधान मोदी यांची घेतली भेट

बघा व्हिडिओ – विश्वविजेत्या भारतीय क्रिकेट संघाने पंतप्रधान मोदी यांची घेतली भेट

विश्वविजेत्या भारतीय क्रिकेट संघाने आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. यावेळी पंतप्रधान...

read more
मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी अडवणूक, दिरंगाई, पैशांची मागणी केल्यास कठोर कारवाई -मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचना

मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी अडवणूक, दिरंगाई, पैशांची मागणी केल्यास कठोर कारवाई -मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचना

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचना योजनेच्या पारदर्शक, गतिमान अंमलबजावणीसाठी प्रत्येक जिल्ह्यात...

read more
चार चोरट्यांच्या मुसक्या आवळत चोरीच्या २३ दुचाकी हस्तगत – मनमाड पोलिसांची दमदार कामगिरी

चार चोरट्यांच्या मुसक्या आवळत चोरीच्या २३ दुचाकी हस्तगत – मनमाड पोलिसांची दमदार कामगिरी

मनमाड - मनमाड शहर पोलिसांनी मोठी चोरीच्या २३ दुचाकी जप्त ४ जणांना अटक करत मोठी कामगिरी केली आहे....

read more
एच.ए. के. हायस्कूल अँड ज्यु. कॉलेज, मनमाड चे ग्रंथपाल मन्सूरी अ.हमीद यांचा सेवापुर्ती सोहळा संपन्न.

एच.ए. के. हायस्कूल अँड ज्यु. कॉलेज, मनमाड चे ग्रंथपाल मन्सूरी अ.हमीद यांचा सेवापुर्ती सोहळा संपन्न.

  मनमाड :-एच.ए. के. हायस्कूल अँड ज्यु. कॉलेज, मनमाड चे ग्रंथपाल मन्सूरी अ. हमीद सक्रोद्दीन हे...

read more
मिशन विधानसभा – मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची अर्थमंत्री अजित पवारांकडून घोषणा

मिशन विधानसभा – मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची अर्थमंत्री अजित पवारांकडून घोषणा

मुंबई, 28 जून : राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या आजच्या दुसऱ्या दिवशी राज्याचे अर्थमंत्री...

read more
जात वैधता कसोट्यांमध्ये सगे सोयरे शब्दाचा समावेश करू नये – नांदगाव सकल ओ बी सी समाजाची मागणी

जात वैधता कसोट्यांमध्ये सगे सोयरे शब्दाचा समावेश करू नये – नांदगाव सकल ओ बी सी समाजाची मागणी

नांदगाव - ओ बी सी भटक्या विमुक्त जाती जमातीचे कार्यकर्ते प्रा. लक्ष्मणराव हाके व नवनाथ (आबा)...

read more
के आर टी हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज मध्ये आंतरराष्ट्रीय योगा दिन मोठ्या उत्साहात साजरा.

के आर टी हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज मध्ये आंतरराष्ट्रीय योगा दिन मोठ्या उत्साहात साजरा.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे प्राचार्य मुकेश मिसर यांनी योगा दिनानिमित्त विद्यार्थ्यांना...

read more
.