Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

अमृत महोत्सवानिमित्त ना. छगन भुजबळांचा नेत्रदानाचा संकल्प

Oct 16, 2021

राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री आणि नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांचा 74 वा वाढदिवस शुक्रवारी, 15 ऑक्टोबर रोजी विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला. त्यानमित्त रुग्णवाहिका लोकार्पण, अंध बांधवांना साहित्याचे वाटप, पुस्तक प्रकाशन, वेबसाइटचे लोकार्पण, नेत्रदान शिबिर असे विविध कार्यक्रम घेण्यात आले. यावेळी पालमंत्री भुजबळांनी स्वतःही नेत्रदानाचा संकल्प सोडला. विशेष म्हणजे भुजबळ यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त 74 लाख नागरिकांचे नेत्रदान करण्याची मोहीम सुरू करण्यात आली आहे. या मोहिमेचा शुभारंभही करण्यात आला. त्यासाठी भुजबळांनी स्वतःचे नाव नोंदविले, सोबतच इतरांनाही सहभागी होण्याचे आवाहन केले.

दरम्यान, भुजबळांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून त्यांच्या कार्याचा यथासांग आढावा घेणारी एक वेबसाइटही सुरू करण्यात आली आहे. chhaganbhujbal.in या वेबसाइटवर त्यांची सर्व माहिती एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे. भुजबळांचे कार्य तळागळातील जनतेला समजावे यासाठी हा उपक्रम हाती घेण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.

अजून बातम्या वाचा..

दिव्यांग बांधवांची दिवाळी होणार गोड भाजपा दिव्यांग आघाडी व मनमाड दिव्यांग ग्रुप  च्या प्रयत्नाला यश

दिव्यांग बांधवांची दिवाळी होणार गोड भाजपा दिव्यांग आघाडी व मनमाड दिव्यांग ग्रुप च्या प्रयत्नाला यश

दिनांक 04/10/2022 रोजी मनमाड नगर परिषदेचे मुख्याधिकारी सचिनकुमार पटेल यांना दर वर्षी मिळणारी 5%...

read more
नाशिक वाहतूक पोलीस आणि अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल तर्फे रस्ते अपघातांबाबत जनजागृती

नाशिक वाहतूक पोलीस आणि अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल तर्फे रस्ते अपघातांबाबत जनजागृती

जागतिक ट्रॉमा दिनानिमित्त मेडिकव्हर हॉस्पिटल्स आणि नाशिक पोलिसांच्या सहकार्याने जनजागृती अभियान...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]