loader image
[ays_poll id=7]

मनमाडच्या हनुमान ट्रेकर्स ने केला साल्हेर किल्ला सर …

Oct 18, 2021


सह्याद्री पर्वत रांगेतील साल्हेर-मुल्हेर या जोडीतला साल्हेरचा किल्ला हनुमान ट्रेकर्स ग्रुप ने सर केला. सह्याद्री पर्वत रांगेतील साल्हेर-मुल्हेर या जोडीतला साल्हेरचा किल्ला असून किल्ल्याची उंची 5175 फूट आहे, जिल्ह्यामधील 66 गिरिदुर्गामध्ये सर्वात उंच किल्ला हा साल्हेर आहे. किल्ल्याच्या माथ्यावरच्या पठारावर एक उंच टेकडी आहे. या टेकडीवर भगवान परशुरामाचे मंदिर आहे. गडाच्या उत्तर दिशेला असलेल्या पठारावर विस्तीर्ण आकाराचा गंगासागर तलाव आहे. गंगासागर तलावाशेजारी गंगा-यमुना टाके आहे. याचे पाणी व गंगोत्री-यमनोत्रीच्या उगमाचे पाणी सारखे आहे, असे डॉ. रघुराज महाराज यांनी संशोधन केले होते. टेकडीच्या वाटेवर गुहा आहेत. गडाच्या पायथ्याला साल्हेर निवासिनी गडकालिका देवीचे सुंदर मंदिर आहे तसेच गृहस्वरूप अमृताभवानी व सिद्धिविनायक गणेश मंदिर आहे. गडाच्या माथ्यावर गुहेत दत्त व हनुमान मंदिर आहे. माथ्यावर रेणुका देवीचे मंदिर असून ही भगवान परशुरामाची माता आहे. माथ्यावरूनच बाण मारून परशुरामाने कोकणची निर्मिती केली होती, अशी आख्यायिका आहे. माथ्यावरील दोन खळगे म्हणजे परशुरामाची उमटलेली पावले आहे. समोर छिद्र पडलेला डोंगर म्हणजे कंडाणा किल्ला आहे. साल्हेर गडाचे स्थान आणि उंची यामुळे आजुबाजुला असलेला विस्तीर्ण मुलुख न्याहाळणे आनंददायी ठरते. मनमाड येथील हनुमान ट्रेकर्स ग्रुप ने संपूर्ण किल्ल्याला प्रदक्षिणा घातली.                                                                                                                                                                    सदर मोहिमेत मनमाड चे मा.नगराध्यक्ष योगेश (बबलू) पाटील, डॉ.योगेश मगर, डॉ.भाऊराव देवरे, राजेंद्र नागरे, गणेश आहेर, किरण भाबड, भागवत झाल्टे, विशाल पाटील, रवी छाजेड, संदेश उगले, श्रेयस देवरे ( वय वर्षे 8) यांनी सहभाग घेतला व मोहीम फत्ते केली .


अजून बातम्या वाचा..

गृहभेटीच्या माध्यमातुन केली जात आहे परस बाग,पोषणवाटीका तयार करणे विषयीची जनजागृती

गृहभेटीच्या माध्यमातुन केली जात आहे परस बाग,पोषणवाटीका तयार करणे विषयीची जनजागृती

बालविकास प्रकल्प अधिकारी (नागरी) जि.नाशिक.अंगणवाडी क्र.७५.मनमाड विभाग येथे श्री. चंद्रशेखर पगारे...

read more
बघा व्हिडिओ – भाद्रपद महागणेशोत्सव 2023 निमित्त वेशीतील प्राचीन श्री निलमणी गणेश मंदीरात सलग नवव्या वर्षी छप्पन महाभोग (महानैवेद्य) संपन्न गणेश भक्तांचा उदंड प्रतिसाद

बघा व्हिडिओ – भाद्रपद महागणेशोत्सव 2023 निमित्त वेशीतील प्राचीन श्री निलमणी गणेश मंदीरात सलग नवव्या वर्षी छप्पन महाभोग (महानैवेद्य) संपन्न गणेश भक्तांचा उदंड प्रतिसाद

मनमाड - आम्ही परंपरा पाळतो... आम्ही संस्कृती चे रक्षण करतो.... हे ब्रीद घेऊन मनमाड शहरात धार्मिक...

read more
अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद नांदगाव तालुका अध्यक्ष पदी सौ. चंद्रकला बोरसे

अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद नांदगाव तालुका अध्यक्ष पदी सौ. चंद्रकला बोरसे

अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद नांदगाव तालुका महिला अध्यक्ष पदी सौ.चंद्रकला राजेंद्र बोरसे...

read more
मनमाड महाविद्यालयाच्या रासेयो स्वयंसेविकेचे  विद्यापीठस्तरीय भित्तीचित्र  स्पर्धेत प्रथम क्रमांक

मनमाड महाविद्यालयाच्या रासेयो स्वयंसेविकेचे विद्यापीठस्तरीय भित्तीचित्र स्पर्धेत प्रथम क्रमांक

महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, मनमाड या महाविद्यालयातील...

read more
.