Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

दुर्गम मलंग गडावर मनमाडच्या गिरिप्रेमिंची यशस्वी चढाई!

Oct 18, 2021

महाराष्ट्रातील कल्याण जवळ असलेल्या हाजी मलंग पर्वत रांगेतील अतिशय दुर्गम व आपल्या विशिष्ट रचणे मूळे प्रसिद्ध असलेल्या मलंग गडावर मनमाडच्या छत्रे विद्यालयाचे क्रीडा प्रशिक्षक प्रवीण व्यवहारे, कंचन ज्वेलर्सचे संचालक तुषार गोयल, रेल्वे अधिकारी संदीप पाटील व बांधकाम व्यावसायिक गणेश वाहले यांनी यशस्वी आरोहण करीत थरारक अनुभव घेतला.
नाशिकच्या पॉइंट ब्रेक एडवेंचर समूहाच्या वतीने आयोजित या साहसी मोहिमेत जवळपास चार तासांची खडी चढाई, कडक उन, घामाच्या धारांनी चिंब भिजत एका उभ्या खडकावर लावलेला 10 ते 12 फुटांचा तुटलेल्या पायऱ्यांवर लावलेला आडवा अधांतरी पाईप खाली बघितले तर खोल दरी जेमतेम एक माणूस उभा राहील अशा कातळात खोदलेल्या अर्धवट पायऱ्या त्यावर दोराच्या सहाय्याने आधार घेत केलेल थरारक पोल क्रॉसिंग बाले किल्ल्यावर जाण्यासाठी बऱ्याच ठिकाणी उभ्या खडकावर खोदलेल्या पायऱ्यांचा थरार अनुभवत शेवटी खाली उतरण्यासाठी 100 फुटांचे प्रस्तरारोहण असा एकदम आगळा वेगळा अनुभव या मोहिमेच्या निमित्ताने सर्वांनी अनुभवला व मलंग गडाच्या बालेकिल्ल्यावर चढाई करणारे पहिले मनमाडकर होण्याचा बहुमान पटकावला.

अजून बातम्या वाचा..

नवरात्र उत्सवाचे औचित्य साधून बाल विकास प्रकल्प अधिकारी (ना) उल्हासनगर अंतर्गत नऊ रंगांवर आधारित विविध पौष्टिक पाककृतींची जनजागृती

नवरात्र उत्सवाचे औचित्य साधून बाल विकास प्रकल्प अधिकारी (ना) उल्हासनगर अंतर्गत नऊ रंगांवर आधारित विविध पौष्टिक पाककृतींची जनजागृती

बाल विकास प्रकल्प अधिकारी (ना) उल्हासनगर अंतर्गत २१७ अंगणवाडी केंद्र कार्यान्वीत आहेत.दिनांक १५...

read more
श्री स्वामी समर्थ केंद्रामध्ये नवरात्रोत्सवा निमित्ताने श्री चंडीयाग संपन्न….

श्री स्वामी समर्थ केंद्रामध्ये नवरात्रोत्सवा निमित्ताने श्री चंडीयाग संपन्न….

योगेश म्हस्के मनमाड : येथील दिंडोरी प्रणित श्री स्वामी समर्थ केंद्रामध्ये नवरात्री निमित्ताने आई...

read more
मनमाड महाविद्यालयात विशाखा समितीच्या वतीने आरोग्य संपदा योजनेअंतर्गत व्याख्यान संपन्न

मनमाड महाविद्यालयात विशाखा समितीच्या वतीने आरोग्य संपदा योजनेअंतर्गत व्याख्यान संपन्न

मनमाड,ता.२१: येथील महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात विशाखा...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]