Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

मंदिर एवढे दिवस का बंद होती याचा सायंटिफिक पद्धतीने अभ्यास करणार -डॉ. भारती पवार यांचा ठाकरे सरकारला टोला

Oct 19, 2021

रुग्णांची संख्या कमी झाल्या नंतरही राज्यात अनेक दिवस मंदिरे बंद होती. ती उघडावी म्हणून भाजपने आंदोलन केले होते, मंदिरे आता राज्यसरकारने उघडली आहेत. हे मंदिर एवढे दिवस का बंद ठेवली हे शोधण्यासाठी आता सायंटिफिक पद्धतीने अभ्यास करण्याचे काम आमचे चालू आहे, असा टोला केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी आज ठाकरे सरकारला लगावला. पुणे महानगरपालिकेमध्ये कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर आयोजित बैठकी नंतर पत्रकारांशी बोलताना मंदिरे उघडण्याच्या मुद्दयाचे डॉ. पवार समर्थन केले.

डॉ. भारती पवार म्हणाल्या, कोरोना चे संकट कमी करण्यासाठी जास्तीत जास्त लसीकरण आवश्यक आहे. पुणे महापालिकेने जास्तीत जास्त शहरात लसीकरण केले असून पुणे महापालिके कडून इतर पालिकांनीही प्रेरणा घ्यावी.

कोरोना हा वायरस आहे त्यावर राजकीय विधान करून चालत नाही.यासाठी शास्त्रीय अभ्यास गरजेचा असतो . असेही त्या म्हणाल्या. कोरोनाची दुसरी लाट खूप कमी झाले आहे असे काही लोक व संशोधक म्हणतात त्यावर पवार म्हणाल्या, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचे रुग्ण पूर्ण कमी झाले नाहीत,ते कमी करण्यासाठी केंद्र सरकारचे लक्ष आहे.

कोरोना हा वायरस प्रत्येकाला होऊ नये यासाठी केंद्र सरकार पुरेपूर काळजी घेत आहे प्रत्येकाच्या सुरक्षेसाठी आम्ही कटिबद्ध असल्याचेही त्यांनी सांगितले.

लहान मुलांना कोरोना हा वाढण्याचा भरपूर धोका आहे त्यावर पवार म्हणाल्या, लहान मुलांच्या लसीकरणाबाबतीत सुरक्षा लक्षात घेता अजून चाचण्या सुरू आहेत.. जे व्यक्ती कोरोना रुग्णांच्या जवळून संपर्कात येतात त्यांनाच केंद्र सरकारने विमा दिला आहे .जवळपास ९०० व्यक्तींना हा विमा केंद्र सरकारने प्रदान केला आहे . असे पवार म्हणाल्या,
लसीबाबत पण त्यांनी विधान केले आज माझ्या भारतात लस तयार होतेय. आणि 9 महिन्यात भारत लसीकरणात शंभर कोटीच्या जवळ पोहोचलाय. हा आत्मनिर्भर भारत होवा असे संपूर्ण जगाला वाटते त्याची वाट संपूर्ण जग पाहतंय . असे भारती पवार म्हणाल्या.

अजून बातम्या वाचा..

सिमेंटच्या जंगलात पक्ष्यांचा किलबिलाट वाढणार, नाशिकमध्ये पहिल्या पक्षी घराचे उद्घाटन !

दिवसेंदिवस मोठ्या शहरात सिमेंटची जंगले वाढत असताना पक्षांचा आवाज कमी कमी होत जात आहे, यातच नाशिक...

read more

सणोत्सवांच्या अनुषंगाने लसीकरण वाढविण्यासाठी नियोजन करावे : पालकमंत्री छगन भुजबळ

ग्रामीण भागातील रुग्णसंख्या कमी करण्यासाठी तसेच सणोत्सवांच्या अनुषंगाने लसीकरण वाढविण्यासाठी...

read more

पिंपळगाव कांदा व्यापाऱ्यांकडे आयकर विभागाला सापडली 26 कोटींहून अधिक रोख रक्कम आणि सुमारे 100 कोटींहून अधिक बेहिशेबी मालमत्ता !

दोन दिवसांपूर्वी आयकर विभागाने पिंपळगाव बसवंत बाजार समितीतील ६ कांदा व्यापाऱ्यांवर छापेमारीची...

read more

शासकीय सेवेतील निवृत्ती वेतनधारकांनी हयातीचे दाखले सादर करावे : डॉ. राजेंद्र गाडेकर

नाशिक जिल्ह्यातील शासकीय निवृत्तीवेतन धारकांनी 31 डिसेंबर 2021 पर्यंत बँकांना हयातीचे दाखले सादर...

read more

कोविड-19 आजाराने मयतांच्या वारसांना सानुग्रह अनुदान मंजुरीसाठी सक्षम प्राधिकरण जाहीर: जिल्हाधिकारी सूरज मांढरे

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशान्वये राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]