loader image
[ays_poll id=7]

OBC राजकीय आरक्षण अध्यादेशाविरोधात हायकोर्टात याचिका !

Oct 23, 2021


सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षण रद्द केले होते. राज्य शासनाने काही दिवसांपूर्वी ओबीसी आरक्षणाबाबत सुधारित अध्यादेश काढला होता, या सुधारित अध्यादेशाला धुळे येथील राहुल रमेश वाघ मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठात आव्हान देणारी याचिका दाखल केली आहे. औरंगाबाद खंडपीठानं प्रतिवादींना यासंदर्भात नोटीस देखील दिली आहे. राज्य सरकारला आता अध्यादेश टिकवण्यासाठी न्यायालयीन लढाईला सामोरं जावं लागणार आहे. दुसरीकडे ओबीसी आरक्षणासाठी काढण्यात आलेला अध्यादेश टिकवण्यासाठी ओबीसी नेते आणि सामाजिक संघटनांचे कार्यकर्ते आक्रमक होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामुळे स्थानिक स्वराज संस्थांमधील ओबीसी समाजासाठी देण्यात आलेलं आरक्षण रद्द करण्याचा निर्णय दिला होता. त्यामुळे महाराष्ट्रातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमधील 50 टक्केंपेक्षा अतिरिक्त ठरणार ओबीसी आरक्षण रद्द झालं होतं. परिणामी या जिल्ह्यांमध्ये पुन्हा पोटनिवडणुका घ्याव्या लागल्या होत्या. महाराष्ट्र सरकारनं यादरम्यान ओबीसींच्या राजकीय आरक्षणासाठी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या स्वाक्षरीनं 23 सप्टेंबर 2021 रोजी अध्यादेश काढला होता.  सदर अध्यादेश रद्द करावा, अशी मागणी धुळे येथील राहुल रमेश वाघ यांनी केलीय.

सर्वोच्च न्यायालयाने घालून दिलेल्या निकषांचे तंतोतंत पालन केले जावे, अशी याचिकेत विनंती करण्यात आली आहे. यापुढेही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका याचिकेच्या अंतिम निकालाच्या अधीन राहतील, अशा पद्धतीनं व्हाव्यात, असं राहुल वाघ यांनी म्हटलंय. धुळे येथील राहुल रमेश वाघ यांनी अध्यादेशाला आव्हान देणारी याचिका दाखल केली आहे.

अजून बातम्या वाचा..

आंतरराष्ट्रीय खेळाडू मुकुंद संतोष आहेर साईराज राजेश परदेशी यांना महाराष्ट्र शासनाचा जिल्हा गुणवंत खेळाडू पुरस्कार जाहीर

आंतरराष्ट्रीय खेळाडू मुकुंद संतोष आहेर साईराज राजेश परदेशी यांना महाराष्ट्र शासनाचा जिल्हा गुणवंत खेळाडू पुरस्कार जाहीर

राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय वेटलिफ्टिंग स्पर्धांमध्ये सातत्याने उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मनमाड...

read more
मनमाड येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातर्फे पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध.

मनमाड येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातर्फे पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध.

मनमाड, दि. २५ एप्रिल २०२५: जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे नुकत्याच घडलेल्या भीषण दहशतवादी हल्ल्याचा...

read more
पहलगाम घटनेचा मनमाड क्रिकेट प्रीमियर लीग च्या वतीने तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला

पहलगाम घटनेचा मनमाड क्रिकेट प्रीमियर लीग च्या वतीने तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला

दिनांक २२/०४/२०२५ रोजी जम्मू काश्मीर राज्यातील पहलगाममधिल बैसरण येथे विदेश.देशभरातिल राज्यातून...

read more
.