Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

नवयुवक क्रिडामंडळ आयोजीत कबड्डी स्पर्धेचा समारोप…. !

Oct 25, 2021

मनमाड शहरात बुधलवाडी येथे नवयुवक क्रिडा मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कबड्डी स्पर्धेचा समारोप सांस्कृतिक क्रिडा मंडळ आणि सम्राट क्रिडा मंडळ या दोन संघाच्या अंतिम सामन्याने झाला.

दिनांक 23 आणि 24 ऑक्टोबर दोन दिवस शहर पातळीवर कबड्डी स्पर्धेचे आयोजन नवयुवक क्रीडा मंडळाच्या वतीने करण्यात आले होते , या स्पर्धेमध्ये शहरातील एकुण 24 संघांनी आपला सहभाग नोंदवला होता. काल झालेला सांस्कृतिक क्रिडा मंडळ आणि सम्राट क्रिडा मंडळाचा अंतिम सामना अत्यंत चुरशीचा होऊन, शेवटच्या क्षणापर्यंत प्रेक्षकांची उत्कंठा वाढवणाऱ्या सामन्यात सम्राट क्रिडा मंडळाने सांस्कृतिक क्रिडा मंडळावर विजय मिळवला.

याप्रसंगी मा.आमदार जगन्नाथ धात्रक , मा.नगराध्यक्ष गणेश धात्रक, मा.नगराध्यक्ष राजेंद्र पगारे, नाशिक जिल्हा कबड्डी असो. कार्यवाह मोहन गायकवाड , शरद शिंदे , वाल्मिक आंधळे , अशोक सानप, निलेश वाघ आदी मान्यवर उपस्थित होते. सदर स्पर्धा या नाशिक जिल्हा कबड्डी असो. यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आल्या. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी नवयुवक क्रिडा मंडळाच्या सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले.

अजून बातम्या वाचा..

फलक रेखाटन दि.२९ एप्रिल २०२४. कलेचे पितामह , आधुनिक भारतीय चित्रकलेचा राजा-राजा रवी वर्मा जयंती

फलक रेखाटन दि.२९ एप्रिल २०२४. कलेचे पितामह , आधुनिक भारतीय चित्रकलेचा राजा-राजा रवी वर्मा जयंती

राष्ट्रीय कला दिन फलक रेखाटनातून विनम्र अभिवादन ! - देव हिरे. (कलाशिक्षक, शिक्षण मंडळ भगूर...

read more
आज ९५ शेतकऱ्यांना मिळणार शेतमालाची थकलेली रक्कम – सभापती गोगड आणि संचालक मंडळाचा पुढाकार

आज ९५ शेतकऱ्यांना मिळणार शेतमालाची थकलेली रक्कम – सभापती गोगड आणि संचालक मंडळाचा पुढाकार

मनमाड - बाजार समितीमधील भाजीपाला खरेदीदार मे. जयमातादी व्हेजिटेबल कंपनी व मे. भारतीबाई शिवनाथ जाधव...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]