Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

मनमाड महाविद्यालयात ‘कोरोना प्रतिबंधक लसीकरण’ शिबिराचे दुसऱ्यांदा आयोजन!

Oct 28, 2021

मनमाड येथील महात्मा गांधी विद्यामंदिर संचालित कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय मनमाड व नांदगाव तालुका आरोग्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयात दिनांक 27 ऑक्टोबर 2021 रोजी विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी covid-19 प्रतिबंधक लसीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आले.
महाराष्ट्र शासनाच्या आदेशान्वये महाविद्यालये दिनांक 20 ऑक्टोंबर 2021 पासून सुरू करण्यात आली परंतु लसींचे दोन डोस पूर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनाच महाविद्यालयात प्रवेश देण्याच्या शासनाच्या धोरणामुळे महाविद्यालयात विद्यार्थ्यांची उपस्थिती अल्प प्रमाणात राहिली. त्यामुळे विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अरुण पाटील यांनी तालुका आरोग्य विभागाच्या सहकार्याने लगेच 21 ऑक्टोबर 2021 रोजी पहिल्या शिबिराचे आयोजन केले. त्यात विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला. त्यामुळे दिनांक 27 ऑक्टोंबर 2021रोजी महाविद्यालयात दुसऱ्या लसीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आले.
सर्व विद्यार्थ्यांचे लसीकरण पूर्ण होण्यासाठी महाविद्यालयात वेळोवेळी लसीकरण शिबिराचे आयोजन करण्याचा महाविद्यालयाचा मानस आहे. या शिबिरासाठी नांदगाव तालुका आरोग्य विभागाचे विशेष सहकार्य लाभत आहे.

अजून बातम्या वाचा..

आर्थिकदृष्ट्या गरीब नागरिकांना अंत्यविधीसाठी मोफत लाकडे उपलब्ध करावी – रिपाइं

आर्थिकदृष्ट्या गरीब नागरिकांना अंत्यविधीसाठी मोफत लाकडे उपलब्ध करावी – रिपाइं

मनमाड शहरात मोठ्याप्रमाणावर रोजंदारीवर काम करणारे नागरिक असून परिवारातील एखाद्या सदस्यांचे निधन...

read more
मोरया गणेश मित्र मंडळातर्फे अनिष्ट रूढी-परंपरांना छेद – विधवा माता-भगिनींना आरतीचा मान…

मोरया गणेश मित्र मंडळातर्फे अनिष्ट रूढी-परंपरांना छेद – विधवा माता-भगिनींना आरतीचा मान…

लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सवाची सुरुवात ही समाज प्रबोधन आणि जनसामान्यांच्या एकात्रीकरणासाठी केली...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]