loader image
[ays_poll id=7]

माजी खा.ईश्‍वरबाबुजी जैन यांची अशोका बिल्डर्स विरोधात फिर्याद : आरोप बिनबुडाचे अशोका बिल्डर्सचा खुलासा !

Oct 29, 2021


उसनवारीने घेतलेले पैसे परत केले नाही, मुदतीची मागणी करुन पैसे देण्यास टाळाटाळ केली तसेच वादग्रस्त जमिनीची माहिती लपवून ठेवत त्याबाबत करारानामा करण्यास भाग पाडून नाशिक येथील अशोका बिल्डर्स व डेव्हलपर्स यांनी माजी खासदार ईश्वरलाल जैन यांची २४ कोटी ६३ लाख १६ हजार ९५१ रुपयात फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी अशोका बिल्डर्सचे मालक अशोक मोतीलाल कटारिया, स्नेहल सतीश पारख उर्फ स्नेहल मंजीत खत्री, सतीश धोंडूलाल पारख, आशिष अशोक कटारिया व राजेंद्र चिंधूलाल बुरड (सर्व रा.नाशिक) यांच्याविरुध्द बुधवारी रात्री शनी पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

माजी खासदार ईश्वरलाल जैन यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, नाशिक येथील अशोका बिल्डर्सचे मालक अशोक कटारिया यांच्यासह पाच जणांनी ईश्वरलाल जैन यांच्याकडून २०१०-११ ते २०१४-१५ या काळात ११ कोटी रुपये व १९ कोटी २४ लाख ६० हजार १२५ रुपये हातउसनवारीने घेतले. त्यातील काही रक्कम या लोकांनी जैन यांना परत केली. उर्वरित ६ कोटी ९९ लाख ३६ हजार ७४१ व १७ कोटी ६३ लाख ८० हजार २१० अशी एकूण २४ कोटी ६३ लाख १६ हजार ९५१ परत मागण्यासाठी तगादा लावला असता त्यांनी मुदतीची मागणी करुन रक्कम देण्यास टाळाटाळ केली. त्यानंतर राजेंद्र बुरड व स्नेहल पारख यांनी ६ कोटी ९९ लाख ७४१ रुपये देण्यास मुदत मागून जॉईंट व्हेंचर अग्रीमेंट तयार करु असे सांगून काही दस्ताऐवज आणले. हे दस्ताऐवज रक्कम परत करण्यास मुदतवाढीचे होते. त्यानंतर १७ कोटी ६३ लाख ८० हजार २१० च्या थकबाकीपोटी देखील संयुक्त करारनामा तयार करुन आणला.

या सर्व लोकांवर विश्वास ठेऊन या करारावर आपण सह्या केल्या, असे जैन यांनी नमूद केले आहे.मानराज मोटर्सच्या नावानेही करार याच काळात मानराज मोटर्स कंपनीला २५ कोटी रुपये तात्काळ देणे असल्याने जैन यांनी रक्कम परत करण्याबाबत पुन्हा या लोकांकडे तगादा लावला. ही संधी साधून दोन्ही जॉईंट व्हेंचर ग्रीमेंटच्या बदल्यात तिसरा पक्ष म्हणून मानराज मोटर्सचे संचालक अशोक बेदमुथा यांना व्यवहारात आणून ३ मार्च २०१७ रोजी डीड ऑफ असाईनमेंट दस्ताऐवज या पाच जणांना बनवून आणले. आपल्या व्यवहारापोटी कटारिया हे परस्पर मानराज मोटर्सला देण्यास तयार असल्याने या करारावर जैन यांनी सही केली. त्यानंतर देखील सहा महिन्याच्या तोंडी मुदतीत रक्कम परत केली नाही. आडगाव, ता.नाशिक, विहिगाव, ता.शरणपूर, जि.ठाणे, सिन्नर व सातपूर येथील जमिनीच्याबाबत करार झालेला होता. यातील काही वाद न्यायालयात आहेत. सिन्नरची जमीन केंद्र सरकारने संपादित केलेली आहे, ही बाब देखील कराराच्यावेळी लपवून ठेवल्याचे जैन यांनी फिर्यादीत नमूद केले आहे. अशा आशयाच्या फिर्यादीवरुन अशोका बिल्डर्सचे मालक अशोक मोतीलाल कटारिया, स्नेहल सतीश पारख उर्फ स्नेहल मंजीत खत्री, सतीश धोंडूलाल पारख, आशिष अशोक कटारिया व राजेंद्र चिंधूलाल बुरड (सर्व रा.नाशिक) यांच्याविरोधात शनिपेठ पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पोलीस निरिक्षक बळीराम हिरे तपास करीत आहेत.

जैन यांचे आरोप बिनबुडाचे : अशोका बिल्डर्सचा खुलासा !

अशोका ग्रुप हा नेहमी कायदेशीर व पारदर्शक व्यवहार करीत असतो. सदर केस अगोदरच न्यायालयातून रद्दबातल करण्यात आलेली आहे. उलट या केस मध्ये आमचीच सवणूक झालेली आहे. यापुर्वी प्रसार माध्यमातून आलेल्या बातम्यांनुसार माजी खासदार ईश्वरलाल जैन हे आर्थिक अडचणीत असल्याचे दिसून येत होते. अनेक बँकांनी त्यांच्याकडे शेकडो कोटी रुपयांच्या वसुलीसाठी तगादा लावल्याचे वृत्त आहे. आमचा न्यायव्यवस्थेवर भरवसा आहे. त्यामुळे आम्हाला न्याय मिळेल, हा पूर्ण विश्वाआहे. आमच्या चारित्र्यहननाच्या विरोधात आम्ही न्यायालयात दाद मागणाआहोत, असे अशोका ग्रुपच्या वकीलांनी स्पष्ट केले आहे.


अजून बातम्या वाचा..

बघा व्हिडिओ : कसाऱ्याच्या पुढे पंचवटी एक्सप्रेसचे कपलिंग तुटली – काही अंतरावर जाऊन इंजिन आणि डबा थांबल्याने पुढील अनर्थ टळला

बघा व्हिडिओ : कसाऱ्याच्या पुढे पंचवटी एक्सप्रेसचे कपलिंग तुटली – काही अंतरावर जाऊन इंजिन आणि डबा थांबल्याने पुढील अनर्थ टळला

मनमाड – मनमाड हून मुंबई येथे रोज जाणारी पंचवटी एक्सप्रेस ही कसारा स्टेशन जवळ कपलिंग तुटल्याने...

read more
बघा व्हिडिओ – विश्वविजेत्या भारतीय क्रिकेट संघाने पंतप्रधान मोदी यांची घेतली भेट

बघा व्हिडिओ – विश्वविजेत्या भारतीय क्रिकेट संघाने पंतप्रधान मोदी यांची घेतली भेट

विश्वविजेत्या भारतीय क्रिकेट संघाने आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. यावेळी पंतप्रधान...

read more
मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी अडवणूक, दिरंगाई, पैशांची मागणी केल्यास कठोर कारवाई -मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचना

मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी अडवणूक, दिरंगाई, पैशांची मागणी केल्यास कठोर कारवाई -मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचना

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचना योजनेच्या पारदर्शक, गतिमान अंमलबजावणीसाठी प्रत्येक जिल्ह्यात...

read more
चार चोरट्यांच्या मुसक्या आवळत चोरीच्या २३ दुचाकी हस्तगत – मनमाड पोलिसांची दमदार कामगिरी

चार चोरट्यांच्या मुसक्या आवळत चोरीच्या २३ दुचाकी हस्तगत – मनमाड पोलिसांची दमदार कामगिरी

मनमाड - मनमाड शहर पोलिसांनी मोठी चोरीच्या २३ दुचाकी जप्त ४ जणांना अटक करत मोठी कामगिरी केली आहे....

read more
एच.ए. के. हायस्कूल अँड ज्यु. कॉलेज, मनमाड चे ग्रंथपाल मन्सूरी अ.हमीद यांचा सेवापुर्ती सोहळा संपन्न.

एच.ए. के. हायस्कूल अँड ज्यु. कॉलेज, मनमाड चे ग्रंथपाल मन्सूरी अ.हमीद यांचा सेवापुर्ती सोहळा संपन्न.

  मनमाड :-एच.ए. के. हायस्कूल अँड ज्यु. कॉलेज, मनमाड चे ग्रंथपाल मन्सूरी अ. हमीद सक्रोद्दीन हे...

read more
मिशन विधानसभा – मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची अर्थमंत्री अजित पवारांकडून घोषणा

मिशन विधानसभा – मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची अर्थमंत्री अजित पवारांकडून घोषणा

मुंबई, 28 जून : राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या आजच्या दुसऱ्या दिवशी राज्याचे अर्थमंत्री...

read more
जात वैधता कसोट्यांमध्ये सगे सोयरे शब्दाचा समावेश करू नये – नांदगाव सकल ओ बी सी समाजाची मागणी

जात वैधता कसोट्यांमध्ये सगे सोयरे शब्दाचा समावेश करू नये – नांदगाव सकल ओ बी सी समाजाची मागणी

नांदगाव - ओ बी सी भटक्या विमुक्त जाती जमातीचे कार्यकर्ते प्रा. लक्ष्मणराव हाके व नवनाथ (आबा)...

read more
के आर टी हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज मध्ये आंतरराष्ट्रीय योगा दिन मोठ्या उत्साहात साजरा.

के आर टी हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज मध्ये आंतरराष्ट्रीय योगा दिन मोठ्या उत्साहात साजरा.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे प्राचार्य मुकेश मिसर यांनी योगा दिनानिमित्त विद्यार्थ्यांना...

read more
.