Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

इंधन दरवाढ : युवासेनेचे राज्यव्यापी आंदोलन !

Oct 29, 2021

केंद्र सरकार दिवसेंदिवस इंधनाची दरवाढ करीत असून सर्वसामान्य नागरिकाला वाढणाऱ्या भरमसाठ महागाईमुळे जगणे मुश्किल झाले आहे. केंद्र सरकारच्या या धोरणाचा निषेध करण्यासाठी युवासेनेच्या वतीने रविवारी ३१ ऑक्टोबर रोजी राज्यव्यापी सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. नांदगाव येथे सकाळी १०.३० वाजता अहिंसा चौक – न्यू इंग्लिश स्कूल – गोदावरी हॉस्पिटल – शनी मंदिर मार्गे हुतात्मा चौक येथे या रॅलीचा समारोप होईल.
मनमाड शहरातही रविवारी सकाळी १०.३० वाजता शिवसेना कार्यालय मालेगाव नाका येथून रॅली सुरू होऊन  बस स्टँड – स्टेशन रोड मार्गे छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे रॅलीचा समारोप होईल. या रॅलीत जास्तीत जास्त युवा सैनिकांनी सहभागी होऊन केंद्र शासनाने केलेल्या इंधन दरवाढीचा निषेध नोंदवावा असे आवाहन युवासेना जिल्हा अधिकारी फरहान खान, उपजिल्हाधिकारी मुन्ना दरगुडे, तालुका अधिकारी सागर हिरे, तालुका समन्वयक योगेश इमले, नितीन सानप, मनमाड युवासेना शहर प्रमुख अमीन पटेल, अंकुश गवळी तसेच नांदगाव युवासेना शहरप्रमुख मुज्जू शेख यांनी केले आहे

अजून बातम्या वाचा..

9 जानेवारीला पुस्तक प्रकाशनाने होणार यंदाच्या वर्षीच्या “स्वामी विवेकानंद व्याख्यानमालेची” सुरुवात….

9 जानेवारीला पुस्तक प्रकाशनाने होणार यंदाच्या वर्षीच्या “स्वामी विवेकानंद व्याख्यानमालेची” सुरुवात….

मनमाड : संस्कृती संवर्धन समितीच्या वतीने आयोजित करण्यात येणाऱ्या स्वामी विवेकानंद...

read more
मा.तात्यासाहेब तथा विश्वासराव देवरे महाविद्यालय,उमराणे मध्ये क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंती साजरी

मा.तात्यासाहेब तथा विश्वासराव देवरे महाविद्यालय,उमराणे मध्ये क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंती साजरी

उमराणे:- श्री गणेश शिक्षण प्रसारक मंडळ, उमराणे संचलित मा. तात्यासाहेब तथा विश्वासराव देवरे कला,...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]