नांदगाव तालुक्यातील तळा गळातील समाज बांधवांना कै.अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या योजनांची माहिती मिळावी व योजनांचा सर्वांना लाभ घेता यावा या करीता एकदिवसीय मार्गदर्शन शिबीराचे आयोजन करण्यासाठी रविवारी 31/10/2021 रोजी सायंकाळी 4:30 वा. शासकीय विश्राम ग्रुह नांदगाव येथे अखिल भारतीय मराठा महासंघाची बैठक आयोजित करण्यात आली आहे.
बैठकीसाठी ग्रामीण जिल्हा अध्यक्ष अशोक कदम, जिल्हा उपाध्यक्ष भास्कर झाल्टे, उल्हास देशमुख व कार्याध्यक्ष कपील निफाडकर आदि उपस्थित राहणार आहेत, तरी तालुक्यातील समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन नांदगाव तालुका प्रमुख भिमराज लोखंडे यांनी केले आहे.











