Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

निष्ठावान वारकरी चिंधाबाबा वैकुंठात विलीन !

Nov 11, 2021

नांदगाव तालुक्यातील निष्ठावान वारकरी चिंधाबाबा हे परम पूज्य तुकाराम बाबा यांच्या बऱ्याचश्या सप्ताहात व्यासपीठचालक होते तसेच गाथा पारायण, हरिपाठ, गायन किंवा काकडा, सदैव तयार या उक्तीप्रमाणे नेहमीच सेवेसाठी तयार असायचे. चिंधाबाबा यांचा तुकाराम गाथेतील हजारो अभंग पाठ होते. भक्तांना तसेच ज्ञानोबा तुकाराम महाराज भगवान विठ्ठल रुक्मिणी यांना प्रसन्न करण्यात त्यांनी आपला देह खर्च केला. याचे उदाहरण म्हणजे एकेकाळी नांदगाव तालुक्यातील सर्वात मोठा सप्ताह हा नस्तनपूर (शनिमहाराज) येथे होत. चिंधाबाबा आमच्यासमोर रात्री 12 किंवा त्यापेक्षा उशीरा झोपत असत पण ज्यावेळेस आम्ही सकाळी उठायचो त्यावेळेस आम्हाला चिंधाबाबा यांचा काकड भजन म्हणताना आवाज यायचा. त्यांचे आपल्या पंचक्रोशीतील भजन म्हणणाऱ्या वारकऱ्यांवर विशेष प्रेम होते. नेहमी हसरे व्यक्तिमत्त्व. 15 ते 20 वर्षांपूर्वी गावोगावी इतके गायक नसायचे त्यावेळेस परम पूज्य वैराग्यमूर्ती हभप तुकाराम बाबा जेऊरकर यांच्याबरोबर किर्तनासाठी नेहमी चिंधाबाबा असायचे. चिंधाबाबा यांना संप्रदायातील जुन्या चाली अवगत होत्या तसेच आपल्या गावात पहिल्या सप्ताहात सुध्दा त्यांची मोलाची भूमिका होती. महाराष्ट्रात आषाढी एकादशीला असंख्य वारी येतात त्यात आपल्या परम पूज्य तुकाराम बाबा यांची वारी फक्त 10 दिवसांत नांदगाव ते पंढरपूरला जाते, हा एक रेकॉर्ड आहे. या वारीत चिंधाबाबा न चुकता जात. चिंधाबाबा हे तुकाराम बाबांची सावली होते. त्यांना कधीपण भजनासाठी बोलवल्यानंतर निस्वार्थी भावाने प्रतिसाद देत. आपल्या वारकरी कुटुंबातील एक अतिशय ज्येष्ठ वारकरी आपल्याला काही तरी नक्कीच शिकवून गेले. चिंधाबाबांचा एकजरी गुण आपण आपल्या आयुष्यात आत्मसात केला तर आपले जीवन सार्थक होइल. आम्ही लहानपणापासून नेहमी हसरा चेहरा बघितला. त्यांचे जीवन नेहमी संप्रदायाच्याप्रती ओढ वाढवणारे होते. भगवान पांडुरंग त्यांना आपल्या वैकुंठ धामात घेवो हिच प्रार्थना. आज आपल्याला जितके रामकृष्णहरी म्हणता येईल तितके चिंधाबाबासाठी म्हणा हिच त्यांच्यासाठी मोठी श्रद्धांजली असेल. चिंधाबाबा आम्ही आपणांस नेहमी आपल्या अध्यात्मिक कार्यामुळे लक्षात ठेवू.

अजून बातम्या वाचा..

नांदगाव महाविद्यालयात विद्यार्थी खळखळून हसले आणी तणाव मुक्त झाले ./ गुनवंत विद्यार्थ्याचा सन्मान

नांदगाव महाविद्यालयात विद्यार्थी खळखळून हसले आणी तणाव मुक्त झाले ./ गुनवंत विद्यार्थ्याचा सन्मान

नांदगाव : मारुती जगधने अनमोल क्षणांचा आनंद घ्या नाराज होऊ नका ध्येयाची वाटचाल निश्चित करा यश तुमचे...

read more
आ.सुहास अण्णा कांदे यांच्यावतीने मनमाड शहर शिवसेनेतर्फे बौद्ध विधी उपासक (बौद्धाचार्य) यांचा सपत्नीक सत्कार व सन्मान

आ.सुहास अण्णा कांदे यांच्यावतीने मनमाड शहर शिवसेनेतर्फे बौद्ध विधी उपासक (बौद्धाचार्य) यांचा सपत्नीक सत्कार व सन्मान

आमदार सुहास आण्णा कांदे यांच्या प्रयत्नातून मनमाड शहरात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा 7...

read more
आधुनिक तंत्रज्ञानाच्या जोडीने दिव्यांग बांधवांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सरकार कटिबद्ध : डॉ. भारती पवार

आधुनिक तंत्रज्ञानाच्या जोडीने दिव्यांग बांधवांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सरकार कटिबद्ध : डॉ. भारती पवार

केंद्रीय सामाजिक न्याय आणि अधिकारीता मंत्रालय, दिव्यांग सशक्तिकरण विभागाअंतर्गत जिल्हा...

read more
छत्रपती शिवाजी महाराज स्मारक लोकार्पण सोहळा – १८ फेब्रुवारीला मनमाड मध्ये भरगच्च कार्यक्रम

छत्रपती शिवाजी महाराज स्मारक लोकार्पण सोहळा – १८ फेब्रुवारीला मनमाड मध्ये भरगच्च कार्यक्रम

मनमाड - अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]