Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकीचा बिगुल वाजला !

Nov 19, 2021

संपूर्ण जिल्हयाला प्रतिक्षा लागून असलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या पंचवार्षिक निवडणुकांसाठी गट, गण रचना करण्याचे आदेश जिल्हा निवडणूक शाखेला प्राप्त झाले आहे. सन २०११ची लोकसंख्या गृहीत धरून ३० नोव्हेंबरपर्यंत ही गट व गण रचना करण्याची कार्यवाही पूर्ण करावी अन राज्य निवडणूक आयोगाला अहवाल सादर करण्याचे सांगण्यात आले आहे. ही कार्यवाही झाल्यानंतर गट आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर केला जाणार आहे. 

याबाबत, राज्य निवडणूक आयोगाकडून गुरुवारी (दि.१८) रात्री उशीरा पत्र प्राप्त झाले आहे. जिल्हा परिषद, पंचायत समित्यांची मुदत फेब्रुवारी २०२२ मध्ये संपुष्टात येत आहे. साधारण ही मुदत संपण्यापुर्वी सहा महिने जिल्हा परिषदेची गट व पंचायत समितीची गण रचना सुरू होते. जि.प. अध्यक्षांचे आरक्षण देखील पडले जाते. गत पाच पंचवार्षिक निवडणुका दरम्यान ऑक्टोबर महिन्यातच गट रचना होऊन गटाचे आरक्षण पडले होते. मात्र, निवडणुका तीन महिन्यांवर येऊन ठेपलेल्या असताना गट, गण रचना व आरक्षणाबाबत हालचाली नसल्याने निवडणुका लांबणीवर पडण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र, राज्य निवडणुक आयोगाने जिल्हा निवडणूक शाखेला पत्र देत गट व गण रचना करण्याचे आदेश बजाविले आहे. गट व गण रचना करतांना सन २०११ची लोकसंख्या विचारत घेण्यात यावी. गट रचना करण्याची पध्दत आयोगाने निश्चित करून दिली आहे. यात साधारण गृहीत धरावयाची लोकसंख्या, कच्चा आराखडा तयार करण्यासाठी समिती, गटांची मांडणी, गटांची संख्या निश्चिती, सरासरी लोकसंख्या, गट, गण रचनेची दिशा यांचा विचार करावा असे सुचविले आहे. गट, गण करतांना तो फोडू नये, अपवादात्मक परिस्थितीत फोडायचा झाल्यास त्यांची प्रणाली देण्यात आली आहे. तयार करण्यात आलेला गट, गण रचनेचा कच्चा आराखडा गोपनीय ठेवण्यात यावा, आरक्षण जाहीर होईपर्यंत कोणासही माहिती देऊ नये अशा स्पष्ट सूचना आयोगाने दिल्या आहेत. 

अजून बातम्या वाचा..

सिमेंटच्या जंगलात पक्ष्यांचा किलबिलाट वाढणार, नाशिकमध्ये पहिल्या पक्षी घराचे उद्घाटन !

दिवसेंदिवस मोठ्या शहरात सिमेंटची जंगले वाढत असताना पक्षांचा आवाज कमी कमी होत जात आहे, यातच नाशिक...

read more

सणोत्सवांच्या अनुषंगाने लसीकरण वाढविण्यासाठी नियोजन करावे : पालकमंत्री छगन भुजबळ

ग्रामीण भागातील रुग्णसंख्या कमी करण्यासाठी तसेच सणोत्सवांच्या अनुषंगाने लसीकरण वाढविण्यासाठी...

read more

पिंपळगाव कांदा व्यापाऱ्यांकडे आयकर विभागाला सापडली 26 कोटींहून अधिक रोख रक्कम आणि सुमारे 100 कोटींहून अधिक बेहिशेबी मालमत्ता !

दोन दिवसांपूर्वी आयकर विभागाने पिंपळगाव बसवंत बाजार समितीतील ६ कांदा व्यापाऱ्यांवर छापेमारीची...

read more

शासकीय सेवेतील निवृत्ती वेतनधारकांनी हयातीचे दाखले सादर करावे : डॉ. राजेंद्र गाडेकर

नाशिक जिल्ह्यातील शासकीय निवृत्तीवेतन धारकांनी 31 डिसेंबर 2021 पर्यंत बँकांना हयातीचे दाखले सादर...

read more

कोविड-19 आजाराने मयतांच्या वारसांना सानुग्रह अनुदान मंजुरीसाठी सक्षम प्राधिकरण जाहीर: जिल्हाधिकारी सूरज मांढरे

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशान्वये राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार...

read more

बालकांच्या सुरक्षिततेची हमी मिळेपर्यंत चाचण्या सुरूच, जोखीम पत्करणार नाही-केंद्रीय मंत्री डॉ.भारती प्रविण पवार!

देशाने गुरुवारी कोविड प्रतिबंधक लसीकरणाचे शंभर कोटींचे लक्ष्य पूर्ण केले. यात महाराष्ट्राचे योगदान...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]