मनमाड – मनमाड शहर स्वच्छ आणि सुंदर करण्यासाठी शहरात स्वच्छते संदर्भात जागृती अभियान राबविणे गरजेचे असल्याचे मत मनमाड ज्येष्ठ नागरिक संघर्ष समितीचे अध्यक्ष राजेंद्र पारिक यांनी समितीच्या बैठकीत केले.
मनमाड ज्येष्ठ नागरिक समितीची आज मासिक बैठक संपन्न झाली या बैठकीत सभासद वाढी संदर्भात चर्चा करण्यात आली.प्रास्ताविक आणि उपस्थितांचे स्वागत सचिव एस एम भाले आणि कार्याध्यक्ष नरेंद्र कांबळे यांनी केले. बैठकीला संचालक रामभाऊ गवळी,दिलीप आव्हाड, गणपत पगारे, आर बी ढेंगले, एस.डी. देवकर आणि कृष्णाजी पगारे उपस्थित होते.
नागपूर येथे शिक्षक स्वागत समारंभ व साहित्य वाटप संपन्न
नागापूर येथे पवित्र पोर्टल मार्फत नवीन नियुक्त झालेल्या शिक्षकांच्या स्वागत समारंभ व नागापूर...










