Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

धोटाणे बुद्रुक आणि पांझणदेव(ता.नांदगाव)येथे पिसाळलेल्या कुत्र्याचा धुमाकूळ, एका महिलेसह एका बालिकेस चावा, दोन्ही ही गंभीर जखमी.

Nov 21, 2021

मनमाड(वार्ताहर):- येथून जवळच असलेल्या धोटाणे बुद्रुक आणि पांझणदेव(ता.नांदगाव)येथे पिसाळलेल्या कुत्र्याने धुमाकूळ घातला असून एका महिलेसह एका बालिकेस चावा घेतल्याने त्यात दोन्ही ही गंभीर जखमी झाल्या असून त्यांना तातडीने उपचारासाठी मनमाड उपजिल्हा रुग्णालयात दाखल असता तेथे लस उपलब्ध नसल्याचा मोठा फटका बसला असून त्यांना पुढील उपचारासाठी मालेगाव व धुळे येथे दाखल करण्यात आले आहे.उपजिल्हा रुग्णालयाच्या गलथान कारभारामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

    याबाबत माहिती अशी की,काल शुक्रवार रोजी धोटाणे बुद्रुक,पांझणदेव(ता.नांदगांव)परिसरात सद्या काही दिवसांपासून मोकाट कुत्र्यांचा मोठा उपद्रव वाढला असल्याने नागरिकांची डोकेदुखी वाढली आहे.त्यात  पिसाळलेल्या कुत्र्याने हैदोस घातला असून पांझनदेव येथील रेखा समाधान डघळे या महिलेच्या गालाला, शरीराला लोचके तोडले तिला गालाला सहा दात लागले आहेत.तर जवळच असलेल्या धोटाने या गावातील

कु.पूर्वा जगदीश कोळेकर(वय,०७) ही खेळता असतांना या मुलीला कुत्र्याने चावा घेतला असून तिच्या डोक्याला व कंपळाला लोचके तोडलेले असून २०हुन अधिक टाके पडले आहे.या पिसाळलेल्या कुत्र्याच्या हल्ल्यात दोन्ही गंभीर जखमी झाल्या असून त्यांना तातडीने मनमाड उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी त्यांना प्रथम मालेगांव आणि त्यानंर धुळे येथे उपचार सुरु असून लहान बालिकेची परिस्थिति चिंताजनक असल्याची माहिती नातेवाइकाने दिली आहे.

कोट- मनमाड ग्रामीण रुग्णालयात औषधचा नेहमीच तुटवडा असल्याची नागरिकांची ओरड आहे तरीही येेथील प्रशासन गांभीर्याने दखल घेत नाही.त्याचा मोठा मनस्थाप सर्वसामान्य नागरिकांना सहन करावा लागत आहे.साधे कुत्र्याचे इंजेक्शन शिल्लक नाही ही मोठी शोकांतीका आहे.त्यामुळे प्रशासनास विनंती आहे की,या रुग्णालयात कुत्रा चावल्यास लागणारी लस उपलब्ध करून द्यावी.

  WA

अजून बातम्या वाचा..

इयत्ता दुसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी असलेली PAT-2 चाचणी नोव्हेंबर २०२६च्या शेवटच्या आठवड्यात

इयत्ता दुसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी असलेली PAT-2 चाचणी नोव्हेंबर २०२६च्या शेवटच्या आठवड्यात

विद्यार्थ्यांनी अपेक्षित अध्ययन निष्पत्ती कितपत साध्य केली आहे, हे तपासणे आणि त्यानुसार अध्यापन...

read more
कवी रवींद्रनाथ टागोर इंग्लिश मीडियम स्कूल व ज्युनिअर कॉलेज येथे महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंती साजरी

कवी रवींद्रनाथ टागोर इंग्लिश मीडियम स्कूल व ज्युनिअर कॉलेज येथे महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंती साजरी

मनमाड येथील कवी रवींद्रनाथ टागोर इंग्लिश मीडियम स्कूल व ज्युनिअर कॉलेज येथे महात्मा गांधी व...

read more
रोजगार महाकुंभ’ भव्य रोजगार मेळावा उत्साहात संपन्न. ११ कंपन्यांचा सहभाग; 236 पेक्षा जास्त युवकांचे रजिस्ट्रेशन आणि जवळपास 162 युवकांची अंतरिम निवड

रोजगार महाकुंभ’ भव्य रोजगार मेळावा उत्साहात संपन्न. ११ कंपन्यांचा सहभाग; 236 पेक्षा जास्त युवकांचे रजिस्ट्रेशन आणि जवळपास 162 युवकांची अंतरिम निवड

नाशिकच्या कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभाग आणि महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित, कला,...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]