loader image
[ays_poll id=7]

महावितरणच्या नाशिक मंडळामध्ये वीजचोरी विरुद्ध मोहीम, एकाच दिवसांत ४८८ जणांवर कारवाई

Dec 9, 2021

वीजचोरी व अनधिकृत वापराविरोधात महावितरण गंभीर असून, याविरोधात ठोस पाऊले उचलीत कारवाईचे सत्र सातत्याने सुरु ठेवीत ०७ डिसेंबर २०२१ या एकाच  दिवशी राबविण्यात आलेल्या विशेष मोहिमेमध्ये महावितरणच्या नाशिक मंडळात  पथकाने वीज चोरी व गैरवापर करणाऱ्ययाविरुद्ध  आकस्मिक कारवाई केली. यामध्ये २ हजार ८५० विद्युत  ग्राहकांची मीटर तपासणी करण्यात येऊन त्यामध्ये  नाशिक शहर १ व २, नाशिक ग्रामीण आणि चांदवड या चारही विभागामध्ये भारतीय विद्युत कायद्याच्या कलम १३५ नुसार ४२३ जणांवर तर कलम १२६ नुसार ६५ ग्राहकांवर अशा एकूण ४८८ जणांवर कारवाई करण्यात आली आहे .  

वीजहानी, गळती व वीजचोरी कमी करण्यासाठी जिल्ह्यात महावितरण सातत्याने प्रयत्नशील असून नाशिक परिमंडळाचे मुख्य अभियंता दिपक कुमठेकर यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक मंडळाचे अधिक्षक अभियंता ज्ञानदेव पडळकर यांच्या नेतृत्वाखाली कार्यकारी अभियंते धनंजय दिक्षीत(नाशिक शहर १), माणिकलाल तपासे(नाशिक शहर २), राजाराम डोंगरे(नाशिक ग्रामीण) व रवींद्र आव्हाड(चांदवड) यांचेसह विविध पथकामध्ये अभियंते, अधिकारी, कर्मचारी व जनमित्र यांनी या मोहिमेत सहभाग घेतला..

वीज मिटरमध्ये हस्तक्षेप करून थेट वीजचोरी करणा-या ग्राहकांमध्ये भारतीय विद्युत कायद्याच्या कलम १३५ नुसार कारवाई करण्यात आली यामध्ये नाशिक शहर १ मध्ये ८, नाशिक शहर २ मध्ये  ७४, नाशिक ग्रामीणमध्ये २१३, चांदवडमध्ये  १२८ जणांवर कारवाई करण्यात आली.

तर विजेचा गैरवापर व घेतलेल्या कारणाशिवाय दुस-या कारणासाठी वापर करीत असल्याचे आढळून आलेल्याविरुद्ध भारतीय विद्युत कायद्याच्या कलम १२६ नुसार कारवाई करण्यात आली. यामध्ये नाशिक शहर १ मध्ये ०४, नाशिक शहर २ मध्ये ३०, नाशिक ग्रामीणमध्ये १३, चांदवडमध्ये  १८ जणांवर कारवाई करण्यात आली अशा प्रकारे एकूण कलम १३५ व कलम १२६ नुसार ४८८ जणांवर कारवाई करण्यात आली आहे.  

यामध्ये नाशिक मंडळातील २ हजार ८५० विद्युत  ग्राहकांची मीटर तपासणी करण्यात आली होती. तर अनधिकृतपणे वीज तारांवर आकडे अथवा हुक टाकणाऱ्या २०८ ठिकाणच्या हुक काढून कार्यवाही करण्यात आली आहे. या मोहिमेमध्ये वीज देयक न भरणाऱ्या ज्या  ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित करण्यात आला होता अशा ठिकाणी सुद्धा  बेकायदेशीर वीज वापर  करताना आढळल्याने त्यांचे विरुद्ध सुद्धा कारवाई करण्यात आली. 

वीजचोरी व गैरप्रकार याविरोधात महावितरण गंभीर असून यापुढे सुद्धा अशाप्रकारे गोपनीय पद्धतीने, सामूहिकरीत्या आणि सातत्याने आकस्मिक कारवाई करण्यात येणार आहे. तरी ग्राहकांनी वीजचोरी, अनधिकृत व गैरवापर टाळून अधिकृत वीज जोडणी घेण्याचे आवाहन महावितरणने  केले आहे.

अजून बातम्या वाचा..

कला, विज्ञान व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालयाची इयत्ता १२वी बोर्ड परीक्षेत उज्वल यशाची परंपरा कायम

कला, विज्ञान व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालयाची इयत्ता १२वी बोर्ड परीक्षेत उज्वल यशाची परंपरा कायम

मनमाड: येथील महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित, कला, विज्ञान व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालयाने इयत्ता...

read more
जिल्हास्तरीय क्रिकेट सामण्यात भुमी क्रिकेट अकॅडमीतील खुशाल परळकर चे दमदार अर्धशतक तर युवराज शर्माचे चार बळी

जिल्हास्तरीय क्रिकेट सामण्यात भुमी क्रिकेट अकॅडमीतील खुशाल परळकर चे दमदार अर्धशतक तर युवराज शर्माचे चार बळी

  रविवार 04 मे 25 रोजी BCCI अंतर्गत असलेल्या महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन क्रिकेट आसोसिएशन...

read more
पिंपरी हवेली येथील प्रतिष्ठित कापूस व्यापारी व समाजसेवक योगेश साहेबराव वाघ यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांचा शिवसेना पक्षात प्रवेश.

पिंपरी हवेली येथील प्रतिष्ठित कापूस व्यापारी व समाजसेवक योगेश साहेबराव वाघ यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांचा शिवसेना पक्षात प्रवेश.

  पिंपरी हवेली येथील सोसायटीचे माजी चेअरमन शिवाजी दामू वाघ बाळासाहेब वाघ पिंटू गांगुर्डे संजय...

read more
सिटू संघटनेसह विविध नगरपालिका कर्मचाऱ्यांचा महाराष्ट्र नगरपालिका कर्मचारी कामगार विकास सेनेत जाहीर प्रवेश

सिटू संघटनेसह विविध नगरपालिका कर्मचाऱ्यांचा महाराष्ट्र नगरपालिका कर्मचारी कामगार विकास सेनेत जाहीर प्रवेश

  "मनमाड शहरात कामगार भवन बांधणार : आमदार सुहास अण्णा कांदे." नांदगाव येथील आमदार निवासस्थानी...

read more
जिल्हास्तरीय क्रिकेट सामण्यात भुमी क्रिकेट अकॅडमीतील खुशाल परळकर शतकवीर तर मयंक भालेरावची अर्धशतकीय खेळी

जिल्हास्तरीय क्रिकेट सामण्यात भुमी क्रिकेट अकॅडमीतील खुशाल परळकर शतकवीर तर मयंक भालेरावची अर्धशतकीय खेळी

  गुरुवार 01 मे 25 रोजी BCCI अंतर्गत असलेल्या महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन क्रिकेट आसोसिएशन...

read more
महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन अंडर 16 जिल्हास्तरीय क्रिकेट सामन्यात भुमी क्रिकेट अकॅडमीतील खुशाल परळकरची शतकीय खेळी हा – जिल्हास्तरीय सामण्यात पहिले शतक

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन अंडर 16 जिल्हास्तरीय क्रिकेट सामन्यात भुमी क्रिकेट अकॅडमीतील खुशाल परळकरची शतकीय खेळी हा – जिल्हास्तरीय सामण्यात पहिले शतक

  गुरुवार 1 मे 25 रोजी BCCI अंतर्गत असलेल्या महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन क्रिकेट असोसिएशन...

read more
.