मनमाड जवळील करी या गावी स्वर्गीय लोकनेते गोपीनाथ मुंडे यांची 73 वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वाल्मीक बाबा सानप होते कार्यक्रमाला सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य तसेच शालेय समितीचे सदस्य उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते गोपीनाथ मुंडे साहेबांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेबांच्या जीवनावर अनेक विद्यार्थ्यांनी भाषण केले तसेच गावातील कार्यकर्त्यांनीही उस्फूर्तपणे मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री पी. टी. मोरे सर यांनी केले. तर प्रास्ताविक मुख्याध्यापक श्री. बी. एस. नागरे सर यांनी केले. आभार प्रदर्शन श्री ए. व्ही. सानप सरांनी केले. के. व्ही. सानप श्री डी. आर. सोनवणे तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
इयत्ता दुसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी असलेली PAT-2 चाचणी नोव्हेंबर २०२६च्या शेवटच्या आठवड्यात
विद्यार्थ्यांनी अपेक्षित अध्ययन निष्पत्ती कितपत साध्य केली आहे, हे तपासणे आणि त्यानुसार अध्यापन...










