Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

कऱ्ही येथे क्रांतिवीर वसंतराव नाईक यांची जयंती साजरी!

Dec 13, 2021

नांदगाव तालुक्यातील कऱ्ही येथील माध्यमिक विद्यामंदिर येथे क्रांतिवीर वसंतराव नाईक यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी आपल्या भाषणामध्ये क्रांतिवीर वसंतराव नाईक यांच्या जीवनावर मनोगत व्यक्त केले. क्रा.वसंतराव नाईक यांचा जन्म नांदगाव तालुक्यातील वेहेळगाव येथील श्रीमंत कुटुंबात १३ डिसेंबर १९१२ रोजी झाला. स्वातंत्र्य प्राप्तीसाठी त्यांनी विविध आंदोलनात सहभाग घेतला. सायमन कमीशनला विरोध करीत महात्मा गांधीजींच्या नेतृत्वाखाली मिठाच्या सत्याग्रहात सहभाग घेतला व तुरंगवास देखील भोगला. भूमीगत राहून त्यांनी इग्रंजांना सळो की पळो करून सोडले. मनमाड नगरपालिकेतील सर्वात तरुण नगराध्यक्ष म्हणूनही त्यांना बहुमान मिळाला. स्वातंत्र्य प्राप्तीनंतर नाशिकमधून दोनदा आमदार म्हणून निवडून आले. क्रांतिवीर वसंतराव नाईक यांचे देशकार्यातील योगदान अतिशय मोठे आहे. सरकारने आजवर त्यांच्या कार्याची नोंद शासकीय दप्तरात करणे आवश्यक होते. मनमाड तसेच नाशिक जिल्ह्यातील नागरिकांनी जशी त्यांची स्मृती जपली आहे तसेच शासनाने त्यांच्या कार्याची स्मृती जपली पाहिजे अशी कळकळीची अपेक्षा सामाजिक कार्यकर्त्यांनी व्यक्त केली. कार्यक्रमास मुख्याध्यापक, शिक्षक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अजून बातम्या वाचा..

मनमाड शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या १०२ व्या जयंती निमित्त अभिवादन

मनमाड शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या १०२ व्या जयंती निमित्त अभिवादन

मनमाड शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या १०२ व्या जयंती निमित्त...

read more
(बघा व्हिडीओ) सौ.अंजुमताई कांदे यांच्या माध्यमातून नांदगाव नगर पालिका शाळेतील ६२० विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप.

(बघा व्हिडीओ) सौ.अंजुमताई कांदे यांच्या माध्यमातून नांदगाव नगर पालिका शाळेतील ६२० विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप.

नांदगाव : लोकमान्य बाळ गंगाधर टिळक पुण्यतिथी आणि साहित्यरत्न आण्णा भाऊ साठे जयंतीचे औचित्य साधून...

read more
वनवासी कल्याण आश्रम मनमाड शाखे तर्फ शहरातील जनजाती समाजातील विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा संपन्न

वनवासी कल्याण आश्रम मनमाड शाखे तर्फ शहरातील जनजाती समाजातील विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा संपन्न

मनमाड : (योगेश म्हस्के) शहर वनवासी कल्याण आश्रमा तर्फे जनजाती समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]