Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

मनमाड महाविद्यालयात ऑनलाईन वेबिनार कार्यक्रम संपन्न

Dec 18, 2021

मनमाड:-महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए.व्ही. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली भूगोल विभागांतर्गत नैसर्गिक साधन संपदा व संवर्धन या विषयावर एक दिवसीय ऑनलाईन वेबिनार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.या ऑनलाइन वेबिनारसाठी प्रमुख व्याख्याते म्हणून लासलगाव महाविद्यालयातील भूगोल विभाग प्रमुख डॉ. सोमनाथ आरोटे यांनी पीपीटी द्वारे विद्यार्थ्यांना बहुमोल असे मार्गदर्शन केले तसेच प्रत्येकाने नैसर्गिक साधन संपत्तीचे संरक्षण केले पाहिजे. याचे महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून दिले या प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए. व्ही. पाटील यांनी मोलाचे मार्गदर्शन केले.या कार्यक्रम प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून निमगाव महाविद्यालय येथील प्राचार्य डॉ.सुभाष निकम व म. स. गा. महाविद्यालय मालेगाव येथील उप-प्राचार्य डॉ. सी.एम. निकम मनमाड महाविद्यालयाचे उप-प्राचार्य डॉ. प्रमोद आंबेकर उपस्थित होते.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक भूगोल विभाग प्रमुख प्रा.एस. आर. पगार यांनी केले तसेच या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन डॉ. गणेश गांगुर्डे यानी केले. कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी शिक्षकेतर कर्मचारी व प्राध्यापक वृंद उपस्थित होते.

अजून बातम्या वाचा..

फलक रेखाटन दि.२९ एप्रिल २०२४. कलेचे पितामह , आधुनिक भारतीय चित्रकलेचा राजा-राजा रवी वर्मा जयंती

फलक रेखाटन दि.२९ एप्रिल २०२४. कलेचे पितामह , आधुनिक भारतीय चित्रकलेचा राजा-राजा रवी वर्मा जयंती

राष्ट्रीय कला दिन फलक रेखाटनातून विनम्र अभिवादन ! - देव हिरे. (कलाशिक्षक, शिक्षण मंडळ भगूर...

read more
आज ९५ शेतकऱ्यांना मिळणार शेतमालाची थकलेली रक्कम – सभापती गोगड आणि संचालक मंडळाचा पुढाकार

आज ९५ शेतकऱ्यांना मिळणार शेतमालाची थकलेली रक्कम – सभापती गोगड आणि संचालक मंडळाचा पुढाकार

मनमाड - बाजार समितीमधील भाजीपाला खरेदीदार मे. जयमातादी व्हेजिटेबल कंपनी व मे. भारतीबाई शिवनाथ जाधव...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]