Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

मनमाड शहरात श्री दत्त जयंती उत्साहात साजरी!

Dec 19, 2021

मनमाड शहरात श्री दत्त जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. गेल्या सात दिवसांपासुन दत्त जयंती निमित्ताने श्री दत्त मंदिर आणि श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र येथे सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते.

श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र येथे गेल्या सात दिवसांपासुन अखंड प्रहारे, श्री गुरुचरित्र, श्री नवनाथ पारायण सेवेकऱ्यांकडुन करण्यात येत होते, नांदगाव तालुक्याचे आमदार सुहास कांदे यांच्या हस्ते सपत्नीक महाआरती करून सप्ताहाची सांगता करण्यात आली.

श्री दत्त मंदिर येथे ही गेल्या सात दिवसांपासुन श्री गुरुचरित्र पारायण, किर्तन आणि भजन सेवा करण्यात येत होती, श्री दत्त मंदिर येथे सायंकाळी सुंदर अशी पाळण्याची आरास करून श्री दत्त जन्म सोहळा साजरा करण्यात आला. या वेळेस शहरातील भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला.

आज दुपारी काल्याचे किर्तन होऊन भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात येणार असुन शहरातील भाविकांनी आणि नागरिकांनी महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

अजून बातम्या वाचा..

9 जानेवारीला पुस्तक प्रकाशनाने होणार यंदाच्या वर्षीच्या “स्वामी विवेकानंद व्याख्यानमालेची” सुरुवात….

9 जानेवारीला पुस्तक प्रकाशनाने होणार यंदाच्या वर्षीच्या “स्वामी विवेकानंद व्याख्यानमालेची” सुरुवात….

मनमाड : संस्कृती संवर्धन समितीच्या वतीने आयोजित करण्यात येणाऱ्या स्वामी विवेकानंद...

read more
मा.तात्यासाहेब तथा विश्वासराव देवरे महाविद्यालय,उमराणे मध्ये क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंती साजरी

मा.तात्यासाहेब तथा विश्वासराव देवरे महाविद्यालय,उमराणे मध्ये क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंती साजरी

उमराणे:- श्री गणेश शिक्षण प्रसारक मंडळ, उमराणे संचलित मा. तात्यासाहेब तथा विश्वासराव देवरे कला,...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]