loader image
[ays_poll id=7]

बंगळूर घटनेचा मनमाड शिवसेनेतर्फे जाहीर निषेध !

Dec 19, 2021


कर्नाटक राज्यातील बंगळूर येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची काही समाज कंटाकांकडून विटंबना करण्यात आली. सदर घटना हि एक लहान घटना आहे, असे उद्गार तेथील मुख्यमंत्री यांनी काढले, या दोन्ही घटनांचा मनमाड शहर शिवसेना शाखेच्या वतीने जळजळीत निषेध करण्यात आला. या घटनेतील दोषींना त्वरित कठोर शासन करण्यात यावे या निवेदन मनमाड पोलीस स्थानकात देण्यात आले. सदर निवेदनावर त्वरित कारवाई न झाल्यास शिवसेना आपल्या पद्धतीने याला प्रतिउत्तर देईल, असा इशारा देखील निवेदनात देण्यात आला आहे. 

निवेदनावर शहरप्रमुख मयूर बोरसे, जिल्हा संघटक राजाभाऊ भाबड, नगरसेवक विनय आहेर, जाफर मिर्झा, सचिन दरगुडे, वाल्मिक आंधळे, सुभाष दरगुडे, अंकुश गवळी, मुन्ना दरगुडे, राजेश धोंडगे, प्रवीण धाकराव, विशाल सुरवसे, नाना बेलदार, निलेश ताठे, राहील मन्सुरी, स्वराज देशमुख, अमीन पटेल, दिनेश केकाण, दिनेश घुगे, प्रवीण नागरे, विद्या जगताप, विद्या राऊत, कविता परदेशी, तुषार गोयल, सतीश परदेशी, सुनील हांडगे, पप्पू दराडे, अनिल दराडे, सुभाष माळवतकर, लक्ष्मन गवळी आदींच्या सह्या आहे.


अजून बातम्या वाचा..

अंकाई ग्रामपंचायत सरपंचांनी राबवला स्तुत्य उपक्रम.. अतिवृष्टीने वाहून गेलेला रस्ता लोकसहभागातून केला दुरुस्त..

अंकाई ग्रामपंचायत सरपंचांनी राबवला स्तुत्य उपक्रम.. अतिवृष्टीने वाहून गेलेला रस्ता लोकसहभागातून केला दुरुस्त..

अंकाई ता येवला येथील अंकाई ते भगतवाडी हा रस्ता अतिवृष्टीमुळे वाहून गेला होता.त्यामुळे भगतवाडी येथे...

read more
.