ओ.बी.सी. समाजाला हक्काचे आरक्षण देण्याबाबत केंद्र सरकार करत असलेल्या दिरंगाईच्या निषेधार्थ अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने बुधवार दि.२२ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता तहसीलदार नांदगाव यांना निवेदन देण्यात येणार आहे.
“नो रिजर्व्हेशन, नो इलेक्शन” ही भूमिका समता परिषदेने घेतली आहे तसेच केंद्र सरकार सर्वोच्च न्यायालयात इम्पेरीकल डाटा देण्यात टाळाटाळ करत आहे, केंद्र सरकारने ओ.बी.सी समाजाचे हक्क डावलण्याचा प्रयत्न चालवला आहे, त्यामुळे केंद्र सरकारच्या भूमिकेच्या निषेधार्थ देखील निवेदन देण्यात येणार आहे. तरी ओबीसी बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याची विनंती समता परिषद नांदगाव तालुका व शहर यांचे वतीने करण्यात आली आहे.
नाईक यांच्या धरणे आंदोलनाचा तिसरा दिवस ; विधानपरिषद सदस्य नरेंद्र दराडे यांनी घेतली भेट
शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख, माजी नगराध्यक्ष,नगरसेवक प्रविण नाईक यांच्यावर दाखल झालेल्या गुन्ह्या...










