loader image
[ays_poll id=7]

कोव्हिड नियमांमुळे पंतप्रधानांनी रद्द केलं स्वतःचं लग्न…!

Jan 24, 2022


न्यूझीलंडमध्ये ओमिक्रॉन व्हेरिएंटचा शिरकाव झाल्याने न्यूझीलंडमध्ये पुन्हा एकदा कठोर नियम लागू करण्यात आले आहेत. त्यामुळे पंतप्रधानपदी असतानाही जेसिंडा आर्डेन यांनी नियमातून पळवाट न शोधता लग्न लांबणीवर टाकलं आहे. एकप्रकारे जेसिंडा यांनी परिस्थितीचं भान कसं राखायचं याचं उदाहरणच दिलं असल्याची चर्चा त्यामुळे रंगली आहे.
.
जेसिंडा टेलिव्हिजन अँकर क्लार्क गेफोर्ड यांच्याशी लग्न करणार आहेत. गेफॉर्ड हे त्यांचे लिव्ह इन पार्टनर आहेत. या युगुलाला एक बाळ देखील आहे.
.
आपल्या निर्णयाविषयी त्या सांगतात, “मी न्यूझीलंडच्या सर्वसामान्य नागरिकांपासून वेगळी नाही. कोरोना संकटाने न्यूझीलंडसह संपूर्ण जगावर भीषण परिणाम झाला आहे. त्यातील सर्वांत अधिक हृदय पिळवटून टाकणारा प्रसंग म्हणजे आपल्या कुटुंबीयांची काळजी घेण्यासाठी आपल्या स्वतःला न हजर राहता येणं.”
.
न्यूझीलंडमध्ये 15,104 कोरोना रुग्ण आढळले असून, 52 जणांचा मृत्यू झाला आहे. रविवारी कोव्हिड संदर्भात नवे नियम लागू झाले. देशात ओमिक्रॉनच्या 9 केसेस आढळल्यानंतर न्यूझीलंडने धोरणात बदल केला आहे. जाहीर कार्यक्रमात लशीचे दोन्ही डोस घेतलेले 100 माणसंच असू शकतील. दुकानं तसंच सार्वजनिक वाहतुकीदरम्यान मास्क परिधान करणं अनिवार्य असेल. लग्नासाठी केवळ 25 व्यक्तीच हजर राहू शकतात.


अजून बातम्या वाचा..

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती निमित्त अभिवादनाचा कार्यक्रम संपन्न

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती निमित्त अभिवादनाचा कार्यक्रम संपन्न

मनमाड -येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे...

read more
मनमाड सार्वजनिक वाचनालया च्या स्पर्धा देशभक्त नागरिक निर्माण करणारी कार्य शाळा

मनमाड सार्वजनिक वाचनालया च्या स्पर्धा देशभक्त नागरिक निर्माण करणारी कार्य शाळा

बाजीराव महाजन मनमाड सार्वजनिक वाचनालयातर्फे स्व.लोकमान्य टिळक आणि लोक शाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या...

read more
रिच एज्युकेशन ऍक्शन प्रोग्राम आणि सेंट झेवियर संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने स्टेम प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न

रिच एज्युकेशन ऍक्शन प्रोग्राम आणि सेंट झेवियर संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने स्टेम प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न

मनमाड - विज्ञान, तंत्रज्ञान अभियांत्रिकी आणि गणित या विषयातील संकल्पना खेळण्याच्या (स्वयंचलित...

read more
.