Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

मनमाड महाविद्यालयात “राष्ट्रीय मतदार दिन”साजरा

Jan 25, 2022

महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथे प्राचार्य डॉ.ए.व्ही.पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय सेवा योजना व राज्यशास्त्र विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने 25 जानेवारी राष्ट्रीय मतदार दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
याप्रसंगी शासकीय प्रतिनिधी म्हणून मनमाड नगर परिषदेचे कार्यालयीन अधीक्षक श्री.अशोक पाईक प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.श्री.पाईक यांनी आपल्या मनोगतातून राष्ट्रीय मतदार दिनाचे महत्त्व विशद करून हा दिवस साजरा करण्यामागील उद्देश विद्यार्थ्यांना सांगितला.व विद्यार्थ्यांना मतदार म्हणून नाव नोंदवण्याचेआवाहन केले. प्राचार्य डॉ.ए.व्ही.पाटील यांनी मनोगत व्यक्त करताना महाविद्यालयातील तरुणांनी देशाच्या उज्ज्वल भवितव्यासाठी अधिकाधिक प्रमाणात मतदान प्रक्रियेत सहभागी होऊन लोकशाही मूल्यांना अधिक बळकट करण्याचा प्रयत्न केला पाहिजे.यासाठी सर्व स्तरातून प्रयत्न होणे गरजेचे आहे असे विचार व्यक्त करून तरुणांनी योग्य व लायक प्रतिनिधी निवडण्यासाठी प्रयत्नशील व जागृत झाले पाहिजे. असे आवाहन केले व विद्यार्थ्यांना मतदार दिनानिमित्त सामूहिक शपथ दिली. कार्यक्रमाप्रसंगी उपप्राचार्य डॉ.पी.जी
आंबेकर, कनिष्ठ विभाग उपप्राचार्या सौ.ज्योती पालवे, वरिष्ठ पर्यवेक्षक डॉ. सतीश तांबे,कनिष्ठ पर्यवेक्षक प्रा. विठ्ठल फंड ,कुल सचिव समाधान केदारे, प्राध्यापक वृंद व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. पवनसिंग परदेशी यांनी तर प्रास्ताविक प्रा.एन.ए. पाटील व सूत्रसंचालन प्रा.सौ. वर्षाराणी पेढेकर यांनी केले. या दिवसानिमित्त 70 विद्यार्थ्यांनी निबंध स्पर्धेत सहभाग नोंदविला. कार्यक्रमाचे आयोजन करताना कोरोना नियमांचे पालन करण्यात आले.राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

अजून बातम्या वाचा..

भविष्यातील चारा टंचाईवर मात करण्यासाठी ‘या’ शेतकऱ्यांना शासन देणार मोफत मका बियाणे

भविष्यातील चारा टंचाईवर मात करण्यासाठी ‘या’ शेतकऱ्यांना शासन देणार मोफत मका बियाणे

राज्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर भविष्यात जाणवणारी चारा टंचाईवर मात करण्यासाठी राज्य...

read more
इयत्ता दुसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी असलेली PAT-2 चाचणी नोव्हेंबर २०२६च्या शेवटच्या आठवड्यात

इयत्ता दुसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी असलेली PAT-2 चाचणी नोव्हेंबर २०२६च्या शेवटच्या आठवड्यात

विद्यार्थ्यांनी अपेक्षित अध्ययन निष्पत्ती कितपत साध्य केली आहे, हे तपासणे आणि त्यानुसार अध्यापन...

read more
कवी रवींद्रनाथ टागोर इंग्लिश मीडियम स्कूल व ज्युनिअर कॉलेज येथे महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंती साजरी

कवी रवींद्रनाथ टागोर इंग्लिश मीडियम स्कूल व ज्युनिअर कॉलेज येथे महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंती साजरी

मनमाड येथील कवी रवींद्रनाथ टागोर इंग्लिश मीडियम स्कूल व ज्युनिअर कॉलेज येथे महात्मा गांधी व...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]