Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर रेल्वे स्थानक व परिसर तपासणी!

Jan 26, 2022

मध्य रेल्वेत मनमाड रेल्वे स्थानक अत्यंत महत्वाचे जंक्शन असून त्याकडे संवेदनशील म्हणूनही बघितले जाते येथे नेहमी प्रवाशांची गर्दी असते त्यामुळे २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर हायलर्ट म्हणून येथे सुरक्षेच्या दृष्टीने रेल्वे स्थानक, परिसर, रेल्वे गाड्या आणि प्रवाशांच्या सामानाची तपासणी डॉगस्कॉड पथकाद्वारे करण्यात आले तर सर्वत्र पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आल्याचे लोहमार्गचे पोलीस निरीक्षक शरद जोगदंड यांनी सांगितले 

मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागात मनमाड रेल्वे स्थानक  एक महत्वाचे जंक्शन मानले जाते. या स्थानकावरून देशाच्या कानाकोपऱ्यातून गाड्यांची ये जा होत असते. तर शिर्डी येथे जाण्यासाठी  त्याच प्रमाणे येथे शीख धर्मियांचा गुरुद्वारा असल्याने दर्शन घेण्यासाठी येथे देशभरातून भाविक येथे येत असतात. त्यामुळे येथे सतत प्रवाशांची गर्दी असते तर राज्याच्या चारही बाजूला जाण्यासाठी येथे गाड्या असल्याने तसेच शहरात इंधन ऑइल कंपन्या, एफसीआयचे धान्य गोदाम, रेल्वेचा मोठा कारखाना असल्याने मनमाड रेल्वे स्थानक हे देशातील इतर स्थानकप्रमाणे संवेदनशील म्हणून मानले जाते देशात कुठेही अनुचित प्रकार घडल्यास या स्थानकावर हाय अलर्ट जारी केले जाते त्यामुळे २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या पाश्वभूमीवर वरिष्ठांकडून हाय अलर्ट आल्याने सुरक्षेच्या दृष्टीने रेल्वे स्थानकाची  तपासणी करण्यासाठी लोहमार्ग पोलीस तसेच आरपीएफ यांनी मालेगाव बीडीडीएस पथक, डॉगस्कॉड पथक पाचारण करण्यात आले रेल्वे स्थानक  सहाही फलाट, फलाटावर येणाऱ्या प्रवाशी गाड्या, प्रवाशांचे बॅगा, पिशव्या, सुटकेस, तसेच अवजड सामान, रेल्वे स्थानक परिसर, तिकीट बुकिंग तसेच पार्सल ऑफिस तपासणी बॉम्ब शोध मशीन तसेच डॉगस्कॉड पथकाद्वारे अगदी कडक तपासणी करण्यात आली तर रेल्वे स्थानकावर सर्वत्र कडक बंदोबस्त ठेवण्यात आला असल्याचे लोहमार्ग पोलीस निरीक्षक शरद जोगदंड यांनी सांगितले

अजून बातम्या वाचा..

तालुका तात्काळ दुष्काळी जाहीर करावा – शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) वतीने तहसीलदारांना निवेदन

तालुका तात्काळ दुष्काळी जाहीर करावा – शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) वतीने तहसीलदारांना निवेदन

पावसाने पाठ फिरवल्यामुळे नांदगाव तालुक्यात भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांसमोर...

read more
आर्थिकदृष्ट्या गरीब नागरिकांना अंत्यविधीसाठी मोफत लाकडे उपलब्ध करावी – रिपाइं

आर्थिकदृष्ट्या गरीब नागरिकांना अंत्यविधीसाठी मोफत लाकडे उपलब्ध करावी – रिपाइं

मनमाड शहरात मोठ्याप्रमाणावर रोजंदारीवर काम करणारे नागरिक असून परिवारातील एखाद्या सदस्यांचे निधन...

read more
विद्यार्थ्याने शाळा सोडल्यानंतर दाखला आणि जनरल रजिस्टर दुरुस्ती अधिकार शिक्षणाधिकाऱ्यांना – मा. मुंबई उच्च न्यायालयाचा दिलासादायक निकाल

विद्यार्थ्याने शाळा सोडल्यानंतर दाखला आणि जनरल रजिस्टर दुरुस्ती अधिकार शिक्षणाधिकाऱ्यांना – मा. मुंबई उच्च न्यायालयाचा दिलासादायक निकाल

शाळा सोडल्यानंतर किंवा शिक्षण पूर्ण झाल्यावर शाळेच्या दाखल्यावर जन्मतारीख, स्वतःचे नाव, वडिलांचे...

read more
मोरया गणेश मित्र मंडळातर्फे अनिष्ट रूढी-परंपरांना छेद – विधवा माता-भगिनींना आरतीचा मान…

मोरया गणेश मित्र मंडळातर्फे अनिष्ट रूढी-परंपरांना छेद – विधवा माता-भगिनींना आरतीचा मान…

लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सवाची सुरुवात ही समाज प्रबोधन आणि जनसामान्यांच्या एकात्रीकरणासाठी केली...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]