Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ८५ व्या “मन की बात ” या कार्यक्रमास मनमाड मध्ये उस्फूर्त प्रतिसाद

Feb 1, 2022

भारताचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी सन २०१४ मध्ये पंतप्रधान पदाची सूत्रे हाती घेतल्या नंतर आपल्या कल्पक संकल्पने तुन आकाशवाणी या प्रसार माध्यमा द्वारे प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या रविवारी देश बांधवांना थेट संबोधित करून जनसंपर्क, जनसंवाद करणे साठी “मन की बात “या अभिनव कार्यक्रम ची सुरवात ०३ ऑक्टोबर २०१४ ला केली याच मन की बात कार्यक्रमा अंतर्गत पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी त्यांचे नेतृत्वाखाली कार्यरत असणाऱ्या अनेक लोककल्याणकारी योजना ची माहिती थेट देशबांधवाना गेल्या सात वर्षात दिली

सध्या भारतीय स्वातंत्र्य लढ्याचे अमृतमहोत्सवी वर्ष सुरू आहे आणि याच स्वातंत्र्य लढ्यातील महान देशभक्त महात्मा गांधी यांची पुण्यतिथी हा दुर्मिळ योग असल्याने भाजपा तर्फे संपूर्ण देश भरात मन की बात या कार्यक्रमाला प्रत्येक शक्तिकेंद्र व बूथ वर आयोजित करण्यात आले महाराष्ट्र भाजपा तर्फे देखील महाराष्ट्र तील ७५००० बूथ आणि १६००० शक्तिकेंद्र वर या कार्यक्रमाचे आयोजन झाले या कार्यक्रमा अंतर्गत मनमाड शहर भाजपा मंडल च्या वतीने मनमाड शहर भाजपा अध्यक्ष जयकुमार फुलवाणी यांचे संयोजन तून शहरातील छत्रपती शिवाजी महाराज नगर ,वीर सावरकर नगर,छत्रपती संभाजी महाराज नगर, श्री दत्त मंदिर रोड, महात्मा फुले,चौक, माणके कंपाउंड , नगरचौकी, कॅम्प , आनंदवाडी परिसर, शाकुंतल नगर,श्री हनुमान नगर , भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर नगर , सिकंदर नगर, बुरकुलवाडी परीसर भागातील 10 शक्तिकेंद्र वर मन की बात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले या परिसरातील नागरिक या मन की बात या कार्यक्रमात उत्साहाने उत्स्फूर्तपणे मोठ्या संख्येने सहभागी झाले या कार्यक्रमास भाजपा नासिक जिल्हा उपाध्यक्ष नितीन पांडे, माजी उपनगराध्यक्ष नारायण फुलवाणी, भाजपा नासिक जिल्हा युवा मोर्चा अध्यक्ष सचिन दराडे,आदी प्रमुख पदाधिकाऱ्यांचे मार्गदर्शन लाभले तर भाजपा व्यापारी आघाडी जिल्हा उपाध्यक्ष सचिन संघवी,भाजपा भटके विमुक्त आघाडी जिल्हा सरचिटणीस अकबर शाह,भाजपा जेष्ठ कार्यकर्ते निळकंठ त्रिभुवन,भाजपा मनमाड शहर संगठन सरचिटणीस नितीन परदेशी, भाजपा अल्पसंख्याक मोर्चा अध्यक्ष जलील अन्सारी नारायण जगताप ,मकरंद कुलकर्णी, ,दीपक शिंदे, अक्षय सानप, आनंद काकडे ,दीपक पगारे,सुमेर मिसर, गोविंद सानप, अमित गोगड मनोज ससाणे आदी प्रमुख भाजपा पदाधिकाऱ्यांन सह भाजपा कार्यकर्ते महिला पदाधिकारी उपस्थित होते हा कार्यक्रम यशस्वी करणे साठी भाजपा मनमाड शहर अध्यक्ष जयकुमार फुलवाणी ,नितीन परदेशी ,जलील अन्सारी यांनी विशेष परिश्रम घेतले

अजून बातम्या वाचा..

भविष्यातील चारा टंचाईवर मात करण्यासाठी ‘या’ शेतकऱ्यांना शासन देणार मोफत मका बियाणे

भविष्यातील चारा टंचाईवर मात करण्यासाठी ‘या’ शेतकऱ्यांना शासन देणार मोफत मका बियाणे

राज्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर भविष्यात जाणवणारी चारा टंचाईवर मात करण्यासाठी राज्य...

read more
इयत्ता दुसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी असलेली PAT-2 चाचणी नोव्हेंबर २०२६च्या शेवटच्या आठवड्यात

इयत्ता दुसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी असलेली PAT-2 चाचणी नोव्हेंबर २०२६च्या शेवटच्या आठवड्यात

विद्यार्थ्यांनी अपेक्षित अध्ययन निष्पत्ती कितपत साध्य केली आहे, हे तपासणे आणि त्यानुसार अध्यापन...

read more
कवी रवींद्रनाथ टागोर इंग्लिश मीडियम स्कूल व ज्युनिअर कॉलेज येथे महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंती साजरी

कवी रवींद्रनाथ टागोर इंग्लिश मीडियम स्कूल व ज्युनिअर कॉलेज येथे महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंती साजरी

मनमाड येथील कवी रवींद्रनाथ टागोर इंग्लिश मीडियम स्कूल व ज्युनिअर कॉलेज येथे महात्मा गांधी व...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]