Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

माझी वसुंधरा अभियानांतर्गत मनमाड शहरात सायकल रॅली संपन्न

Feb 3, 2022

माझी वसुंधरा अभियान अंतर्गत आज दि.03 फेब्रुवारी रोजी सकाळी 09.00 वाजता मनमाड नगर परिषदे मार्फत सायकल रॅली आणि विद्यार्थ्यांची प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले होते.

पर्यावरणाच्या रक्षणासाठी ‘माझी वसुंधरा’ हे अभियान राबविण्यात येत आहे , या मध्ये नागरिकांना मार्गदर्शन करून विविध उपक्रम हे प्रशासना द्वारे घेण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून आज सायकल रॅली चे आयोजन करण्यात आलेले होते. सायकल चालवण्याचे अनेक फायदे आहेत, नियमित सायकल चालवल्याने शरीराचा व्यायाम होत असतो , इंधनाची बचत होत असते , वायु प्रदुषण कमी होत असते, अशा प्रकारचे अनेक फायदे सायकल चालवल्याने होत असतात.शहरातील गणेश कुंडापासून रॅलीला सुरवात होऊन छत्रपती शिवाजी महाराज चौक , डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा , मनमाड नगर परिषद , महात्मा गांधी पुतळा मार्गे रॅली जाऊन छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे सायकल रॅलीचा समारोप करण्यात आला.

सायकल रॅलीला मनमाड नगर परिषदेचे मुख्याधिकारी डॉ. श्री. विजयकुमार मुंडे यांनी फित कापुन शुभारंभ केला , या उपक्रमामध्ये नगरपालिकेचे अधीकारी आणि कर्मचारी , पेडल फॉर हेल्थ सायकल ग्रुप, लायन्स क्लब ऑफ मनमाड सिटी , शहरातील शालेय विद्यार्थी , पर्यावरण आणि सायकल प्रेमी नागरिक सहभागी झाले होते.

अजून बातम्या वाचा..

बुरुकुलवाडी सबस्टेशन जवळ अस्तगाव रोडवरील पांझन नदी पुलाजवळ सुरक्षा कठडे लावावेत – संजय दराडे

बुरुकुलवाडी सबस्टेशन जवळ अस्तगाव रोडवरील पांझन नदी पुलाजवळ सुरक्षा कठडे लावावेत – संजय दराडे

  मनमाड – स्थानिक नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या अस्तगाव...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]