loader image
[ays_poll id=7]

राजपथावरील पथसंचलनात महाराष्ट्राचा चित्ररथ प्रथम क्रमांकाचा मानकरी !

Feb 5, 2022


प्रजासत्ताक दिनी राजपथावरील पथसंचलनात सहभागी झालेला जैवविविधता व राज्य मानके या विषयावरील महाराष्ट्राच्या चित्ररथास ‘लोकपसंती’ या वर्गवारीत देशात प्रथम क्रमांकाचा पुरस्कार जाहीर झाला आहे.

प्रजासत्ताक दिनाच्या संचलनामध्ये सहभागी झालेल्या १२ राज्ये/ केंद्रशासित प्रदेश सहभागी झाले होते. यावर्षीपासून राजपथावरील पथसंचलनात सामील झालेल्या राज्यांच्या चित्ररथाला आणि लष्करी मार्चिग तुकडीला ऑनलाइन नोंदणीद्वारे मत देऊन पसंती देता येईल, असे संरक्षण मंत्रालयाने जाहीर केले होते. त्याप्रमाणे राजपथावरील पंथसंचलन संपल्यानंतर पोर्टलवर ३१ जानेवारीपर्यंत ऑनलाइन मतनोंदणी सुरू होती. शुक्रवारी या पथसंचलनाचा निकाल जाहीर करण्यात आला. त्यात भारतीय नौदलाच्या संचलन तुकडीला तिन्ही सेवांमध्ये सर्वोत्तम संचलन तुकडी म्हणून घोषित करण्यात आले, तर लोकप्रिय निवडीनुसार भारतीय हवाई दलाची संचलन तुकडी तिन्ही सेवांमध्ये सर्वोत्तम संचलन तुकडी म्हणून निवडली गेली आहे, तर याच श्रेणीमध्ये राज्याच्या चित्ररथाची सर्वोत्तम म्हणून निवड झाली.


अजून बातम्या वाचा..

आंतरराष्ट्रीय खेळाडू मुकुंद संतोष आहेर साईराज राजेश परदेशी यांना महाराष्ट्र शासनाचा जिल्हा गुणवंत खेळाडू पुरस्कार जाहीर

आंतरराष्ट्रीय खेळाडू मुकुंद संतोष आहेर साईराज राजेश परदेशी यांना महाराष्ट्र शासनाचा जिल्हा गुणवंत खेळाडू पुरस्कार जाहीर

राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय वेटलिफ्टिंग स्पर्धांमध्ये सातत्याने उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मनमाड...

read more
मनमाड येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातर्फे पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध.

मनमाड येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातर्फे पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध.

मनमाड, दि. २५ एप्रिल २०२५: जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे नुकत्याच घडलेल्या भीषण दहशतवादी हल्ल्याचा...

read more
पहलगाम घटनेचा मनमाड क्रिकेट प्रीमियर लीग च्या वतीने तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला

पहलगाम घटनेचा मनमाड क्रिकेट प्रीमियर लीग च्या वतीने तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला

दिनांक २२/०४/२०२५ रोजी जम्मू काश्मीर राज्यातील पहलगाममधिल बैसरण येथे विदेश.देशभरातिल राज्यातून...

read more
.