आज दिनांक 17 /2 /2022 रोजी मनमाड महाविद्यालयात स्वर्गीय रेणुका आजी भाऊसाहेब हिरे यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली. या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ अरुण पाटील यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. आपल्या अध्यक्षीय मनोगतातून प्राचार्य डॉ अरुण पाटील यांनी आजींच्या जीवनकार्याविषयी माहिती सांगितली. यशस्वी पुरुषामागे एका स्त्रीचा हात असतो या उक्तीप्रमाणे रेणुका आजींनी कर्मवीर भाऊसाहेब हिरे यांना संपूर्ण जीवनभर सामाजिक, राजकीय क्षेत्रात भरभक्कम अशी साथ दिली असे प्रतिपादन केले. कनिष्ठ महाविद्यालयाचे प्रा अमोल देसले यांनी आपल्या मनोगतातून स्व रेणुका आजी हिरे यांचा जीवनपट उलगडत असताना अगदी प्रारंभीच्या काळापासून तर शेवटपर्यंतच्या आजींच्या कार्याचा आढावा घेतला यात हिरे घराण्याच्या नावलौकिकासाठी आजींचे मौलिक असे योगदान आहे असे प्रा.अमोल देसले यांनी स्पष्ट केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डी. डी.हिरे यांनी केले. सदर कार्यक्रमासाठी वरिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. पी.जी.आंबेकर, कनिष्ठ महाविद्यालयाच्या उपप्राचार्या सौ ज्योती पालवे, कुलसचिव श्री समाधान केदारे, महाविद्यालयातील प्राध्यापक, प्रशासकीय कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन करताना कोरोना नियमांचे पालन करण्यात आले.
इयत्ता दुसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी असलेली PAT-2 चाचणी नोव्हेंबर २०२६च्या शेवटच्या आठवड्यात
विद्यार्थ्यांनी अपेक्षित अध्ययन निष्पत्ती कितपत साध्य केली आहे, हे तपासणे आणि त्यानुसार अध्यापन...











