वर्षा शासकीय निवासस्थानी मुख्यमंत्री श्री.ठाकरे यांनी संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. गाडगेबाबा यांचे जीवन हाच एक संदेश आहे. त्यांनी आयुष्यभर जनकल्याणाचा विचार केला. समाजातील वाईट चालीरिती हद्दपार व्हाव्यात यासाठी प्रबोधन केले. त्यांची दशसुत्री जनकल्याणाचा मार्ग दाखविते. या दशसुत्रीनुसारच आमची वाटचाल सुरू आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी अभिवादनात म्हटले आहे.
माजी नगराध्यक्ष प्रवीण नाईक यांना मातृशोक
शिवसेना सहसंपर्क प्रमुख, नगरसेवक श्री. प्रवीण (पिंटूभाई) नाईक यांच्या मातोश्री हिराबाई अरविंद नाईक...











