मनमाड येथील सौ.साधना सुधीर पाटील यांची सन २०२२-२३ साठी लायन्स डिस्ट्रिक्ट चेअरपर्सन म्हणून निवड करण्यात आली आहे. मनमाड शहरातून प्रथम महिला झोन चेअरपर्सन होण्याचा मां सौ.साधना सुधीर पाटील यांना मिळाला आहे. लायन्स डिस्ट्रिक्ट मध्ये लायन्सचे नवनिर्वाचित प्रांतपाल राजेश कोठावदे यांनी मनमाड शहरातून सौ.साधना पाटील यांची झोन चेअरपर्सन म्हणून निवड केली आहे.गेल्या दहा ते बारा वर्षांपासून सौ.साधना पाटील यांनी लायनेस क्लब ऑफ मनमाड सिटी आणि लायन्स क्लब ऑफ मनमाड सिटीच्या माध्यमातून सामाजिक कार्य करीत आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटविला. त्यांच्या या निवडी बद्दल सर्वत्र त्यांचे कौतुक होत असून या प्रवासात मार्गदर्शन लाभलेल्या सर्वांचे साधना पाटील यांनी आभार व्यक्त केले आहे.
ठाणे पोलिस सहायक आयुक्तपदी बागडे
भगूर : भगूरचे रहिवासी व वीर सावरकर जयंती उत्सव समितीचे प्रमुख पोनि शेखर रामदास बागडे यांची ठाणे...











